News18 Lokmat

पंतप्रधान मोदींनी का देण्यात आला 'चॅम्पियन्स ऑफ द अर्थ' पुरस्कार ?

संयुक्त राष्ट्राचे अध्यक्ष अँटोनियो गुटेरेस यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

News18 Lokmat | Updated On: Oct 3, 2018 05:33 PM IST

पंतप्रधान मोदींनी का देण्यात आला 'चॅम्पियन्स ऑफ द अर्थ' पुरस्कार ?

नवी दिल्ली, 03 सप्टेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'चॅम्पियन्स ऑफ द अर्थ' पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आलंय. काही दिवसांपूर्वी संयुक्त राष्ट्रसंघानं या पुरस्काराची घोषणा केली होती आणि विशेष महत्वाची बाब म्हणजे संयुक्त राष्ट्र संघाचा हा कार्यक्रम नवी दिल्लीत आयोजित करण्यात आला.

संयुक्त राष्ट्राचे अध्यक्ष अँटोनियो गुटेरेस यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पर्यावरण क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी आणि निर्णय घेतल्यानं पंतप्रधानांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. त्यांना आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांना संयुक्तरित्या हा पुरस्कार जाहीर झाला होता.

Loading...

नरेंद्र मोदींना का देण्यात आला हा पुरस्कार ?

पर्यावरण क्षेत्रात असाधारण योगदान देण्यात आल्यामुळे या पुरस्काराने सन्मानित करण्यत येत असतं. पंतप्रधान मोदींनी विकास, जलवायू परिवर्तन करण्यासाठी आपल्या नेतृत्वात सकारात्मक पाऊलं उचलली म्हणून त्यांना 'चॅम्पियन्स ऑफ द अर्थ' पुरस्कार देण्यात आला. मोदींनी आंतरराष्ट्रीय सौर ऊर्जा संबंधी नेतृत्व आणि 2022 पर्यंत प्लास्टिक मुक्त भारताचा संकल्प केल्यामुळे त्यांना हा पुरस्कार देण्यात आलाय. त्यांचे ध्येय धोरण आणि नेतृत्वाच्या निकषावर हा पुरस्कार देण्यात आलाय.

चॅम्पियन्स ऑफ द अर्थ' चा अर्थ ?

संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाने 2005 पासून जनसमुदयासाठी पर्यावरणपूरक निर्णय घेणाऱ्या नेत्यांना या पुरस्कारने सन्मानित करण्यासाठी पृथ्वीचे चॅम्पियन्सची स्थापन करण्यात आली. दरवर्षी पाच ते सात जणांना हा पुरस्कार दिला जातो. प्रत्येक विजेत्याला एक स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात येतो. विजेते यावेळी आपले एखा कार्यक्रमात मनोगत व्यक्त करतात आणि पत्रकार परिषदेतही सहभागी होतात. हा पुरस्कार संयुक्त राष्ट्र महासंघाचा एक भाग आहे. हा पुरस्कार यूएनईपीच्या ग्लोबल 500 रोल आॅफ आॅनर अवार्ड म्हणून सुरू करण्यात आला होता. 2017 मध्ये युवा चॅम्पियन्स ऑफ द अर्थ चा समावेश करण्यात आला होता.

=============================================

VIDEO : नवनीत राणांचा धम्माल दांडिया डान्स

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 3, 2018 05:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...