All Is Well... ISRO ची तयारी पूर्ण, 'चांद्रयान-2' उद्या झेपावणार

All Is Well... ISRO ची तयारी पूर्ण, 'चांद्रयान-2' उद्या झेपावणार

'आता बिघाड दुरुस्त करण्यात आला असूनं त्याचं नेमकं कारण कळालं आहे. त्यामुळे यावेळी 'चांद्रयान-2' अडचण येणार नाही.'

  • Share this:

श्रीहरीकोटा 21 जुलै : सगळ्या देशाला प्रतिक्षा असलेल्या 'चांद्रयान-2'चं उद्या 22 जुलैला प्रक्षेपण होणार आहे. श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून हे यान उड्डाण घेणार आहे. दुपारी 2.43 मिनिटांनी 'चांद्रयान-2'चं उड्डाण होईल. ISROने सगळी तयारी पूर्ण केली असल्याची माहिती ISROचे प्रमुख के सिवन यांनी दिलीय. आज रात्रीपासून त्याचं काऊंटडाउन सुरू होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. या आधी क्रायोजिनिक इंजिनमध्ये इंधन भरताना तांत्रिक दोष आढळल्याने तासभर आधी चांद्रयान-2चं उड्डाण रद्द करण्यात आलं होतं. आता बिघाड दुरुस्त करण्यात आला असूनं त्याचं नेमकं कारण कळालं आहे. त्यामुळे यावेळी अडचण येणार नाही अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

VIDEO: पाकिस्तानमधील रुग्णालयात महिलेचा आत्मघातकी हल्ला, 9 जणांचा मृत्यू

याआधी 15 जुलै रोजी मध्य रात्री चांद्रयान-2चे प्रक्षेपण होणार होते. पण ऐनवेळी तांत्रिक बिघाड लक्षात आल्याने ही मोहिम स्थगित करण्यात आली होती. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमधून जीएसएलव्ही मार्क 3च्या मदतीने चांद्रयान-2 अवकाशात झेपवणार होते. पण प्रक्षेपण होण्याच्या 56 मिनिटे आणि 24 सेकंद आधी मोहीम थांबवण्यात आली. जीएसएलव्ही मार्क 3 मध्ये इंधन भरत असताना तांत्रिक चूक आढळली आणि हा निर्णय घेण्यात आला. चांद्रयान-2चे प्रक्षेपण थांबवण्यात आल्याने अनेकांना धक्का बसला. संपूर्ण मोहीम पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात इतकी मोठी तांत्रिक दोष असल्यामुळेच मोहीम पुढे ढकलण्यात आली. जर या दोषाकडे दु्र्लक्ष केले असते तर संपूर्ण मोहीमच फसली असती आणि 11 वर्षापासून भारतीय शास्त्रज्ञांनी पाहिलेले स्वप्न व 960 कोटी रुपये पाण्यात गेले असते.

VIDEO: मुंबईतील चर्चिल चेंबरमधील आगीवर नियंत्रण, परिसरात धुराचे लोट

जीएसएलव्ही मार्क 3 इंधन भरत असताना हा दोष समोर आला नसता तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती. भारताची महत्वाकांक्षी मोहीम अपयशी ठरली असती. चंद्राच्या ज्या भागावर आजपर्यंत कोणीही पोहोचले नाही तेथे भारताचे चांद्रयान-2 जाणार होते. या मोहिमेत चंद्राच्या भूमीवर सॉफ्ट लँडिंगद्वारे रोव्हर उतरवला जाणार होता.

Published by: Ajay Kautikwar
First published: July 21, 2019, 5:58 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading