#फ्लॅशबॅक2017 : देशभरात गाजलेले 'राजकीय वाद'

#फ्लॅशबॅक2017 : देशभरात गाजलेले 'राजकीय वाद'

या वर्षाला निरोप देताना एक नजर टाकूयात 2017मध्ये गाजलेल्या राजकीय वादांवर

  • Share this:

31 डिसेंबर : आजच्या दिवशी 2017ला आपण सगळचे निरोप देतोय. 2017 काहींसाठी चांगलं तर काहींसाठी वाईटही गेलं असेल. त्याचप्रमाणे राजकारणातही मोठे वादविवाद झाले. या वर्षाला निरोप देताना एक नजर टाकूयात 2017मध्ये गाजलेल्या राजकीय वादांवर.

- गुजरात निवडणुकीच्या रणधुमाळीतच युवक काँग्रेसनं चायवाला म्हणून मोदींची खिल्ली उडवली. मोदींची खिल्ली उडवणारं कार्टून ट्विट केल्यानं निवडणुकीत मोठा वाद झाला. भाजपनं या टीकेचा वापर करत मन की बात चाय के साथ हा प्रयोग राबवला.

- 2014 च्या निवडणुकीत मोदींना चायवाला म्हणत काँग्रेसला अडचणीत आणणाऱ्या मणिशंकर अय्यर यांनीच नरेंद्र मोदींबद्दल अपशब्द वापरले. त्यामुळे राहुल गांधी यांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली.

- राहुल गांधी यांची सोमनाथ मंदिराला दिलेली भेट वादग्रस्त ठरली. राहुल गांधींचा धर्म कोणता हा प्रश्न विचारला जाऊ लागला. त्यामुळे काँग्रेसला राहुल जानवं घालणारे हिंदू असल्याचं स्पष्टीकरण द्यावं लागलं.

- खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर हल्लाबोल केला. 'अहमद पटेल यांना गुजरातचा मुख्यमंत्री करण्यासाठी पाकिस्तान मदत करतंय. मनमोहन सिंग हे पाकिस्तानी नेत्यांसोबत गुजरात निवडणुकीवर चर्चा करत होते.' असा घणाघाती हल्ला मोदींनी केला. त्यावर संसदेतही गदारोळ झाला.

- 2017मध्ये ईव्हीएमचा मुद्दाही गाजला. ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा होतोय, चिन्ह कुठलंही दाबा मत भाजपलाच जातं असा आरोप विरोधकांनी केला. त्यावर हे सिद्ध करून दाखवा, असं आव्हान खुद्द निवडणूक आयोगानंच दिलं.

- गोरक्षकांच्या उन्मादाचा मुद्दा यावर्षीही चर्चेत राहिला. बीफ नेत असल्याच्या संशयावरून हरियाणातल्या फरिदाबादमध्ये 19 वर्षांच्या जुनैदची रेल्वेतच छळ करून हत्या करण्यात आली.

- गाय चोरल्याच्या आरोपावरून पश्चिम बंगालमध्ये तीन जणांची बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली.

First published: December 31, 2017, 3:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading