S M L

गाईच्या नावावर हल्ले करणाऱ्यांवर राज्य सरकारांनी कठोर करवाई करावी- मोदी

यात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गाईच्या नावावर हल्ले करणाऱ्यांवर राज्य सरकारांनी कठोर करवाई करावी असे आवाहन केलं आहे, तसचं भ्रष्टाचारी नेत्यांवर कारवाई व्हावी आणि राजकीय पक्षांनी त्याला समर्थन द्यावे असेही मोदी या बैठकीत म्हणाले.

Sonali Deshpande | Updated On: Jul 16, 2017 04:11 PM IST

गाईच्या नावावर हल्ले करणाऱ्यांवर राज्य सरकारांनी कठोर करवाई करावी- मोदी

16 जुलै : सोमवारपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाआधी सरकारने सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. यात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गाईच्या नावावर हल्ले करणाऱ्यांवर राज्य सरकारांनी कठोर करवाई करावी असे आवाहन केलं आहे, तसचं भ्रष्टाचारी नेत्यांवर कारवाई व्हावी आणि राजकीय पक्षांनी त्याला समर्थन द्यावे असेही मोदी या बैठकीत म्हणाले.

सभागृहाचे कामकाज चालवण्यात विरोधक सहकार्य करतील असा विश्वास या बैठकीत संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार यांनी व्यक्त केला.दरम्यान शेतकरी आत्महत्या,अंतर्गत सुरक्षा आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावर सरकारला सभागृहात उत्तर द्यावे लागेल असे काँग्रेसने स्पष्ट केले आहे. एकूण 18 नवीन बिलं सरकार या सत्रात आणणार आहे.

एक महिना चालणाऱ्या या अधिवेशनात अमरनाथ हल्ला, भारत चीन सीमेवर निर्माण झालेला तणाव, आणि जीएसटी कायद्याची अंमलबजावणी यासारख्या मुद्द्यावर विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे. 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 16, 2017 04:05 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close