Elec-widget

अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर पवारांच्या घरी विरोधकांची बैठक

अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर पवारांच्या घरी विरोधकांची बैठक

उद्या अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर उद्या सकाळी शरद पवारांच्या निवासस्थानी पुन्हा विरोधकांची बैठक होणार आहे.

  • Share this:

31 जानेवारी : उद्या अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर उद्या सकाळी शरद पवारांच्या निवासस्थानी पुन्हा विरोधकांची बैठक होणार आहे. अर्थसंकल्पावर काय भूमिका घ्यायची, आणि तिहेरी तलाक प्रतिबंधक विधेयकावर राज्यसभेत कोणती भूमिका घ्यायची, यावर या बैठकीत चर्चा होऊ शकते.

पुढच्या वर्षी निवडणुका आहेत, आणि यंदाचा अर्थसंकल्प हा निवडणुकांपूर्वीचा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे. त्यामुळे विरोधक एकत्रित आहेत, असं चित्र त्यांना दाखवायचं असावं, असं तज्ज्ञांचं मत आहे.

कोण लावू शकतं हजेरी ? 

- काँग्रेस

- द्रमुक

Loading...

- तृणमूल काँग्रेस

- बहुजन समाज पार्टी

- जेडीयूचे बंडखोर नेते शरद यादव

- नॅशनल कॉन्फरन्स

- माकप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 31, 2018 12:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...