मराठी बातम्या /बातम्या /देश /

कोरोनाचं थैमान, CBSE ने पुढे ढकलल्या 10 आणि 12 वीच्या परीक्षा

कोरोनाचं थैमान, CBSE ने पुढे ढकलल्या 10 आणि 12 वीच्या परीक्षा

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

कोरोनाचा धोका लक्षात घेत आता CBSE बोर्डाने 10 आणि 12 वीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

  • Published by:  Akshay Shitole
मुंबई, 18 मार्च : कोरोना व्हायरसमुळे देशभरातील जनजीवनावर परिणाम झाला आहे. हा व्हायरस मोठ्या प्रमाणात पसरू नये म्हणून प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहे. त्यामुळे अनेक राज्यांतील शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यातच कोरोनाचा धोका लक्षात घेत आता CBSE बोर्डाने 10 आणि 12 वीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील काही दिवसांमध्ये होणाऱ्या CBSE बोर्डाच्या 10 आणि 12 वीच्या परीक्षा आता 31 मार्चनंतर घेण्यात येणार आहेत. एकीकडे CBSE बोर्डाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असला तरीही स्टेट बोर्डाकडून अद्याप असा निर्णय घेण्यात आलेला नाही. IIT आणि इतर केंद्रीय संस्थांसाठी आवश्यक प्रवेश परीक्षा JEE सुद्धा पुढे ढकलण्यात आली आहे. 31 मार्चनंतर परीक्षांच्या तारखेसंदर्भातले निर्णय कळवले जातील. PM मोदी जनतेशी संवाद साधणार! जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या भारतात वाढत चालली आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी याबद्दल आढावा घेतल्यानंतर उद्या जनतेशी संवाद साधण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान मोदी उद्या गुरुवारी संध्याकाळी जनतेला उद्देशून भाषण करणार आहेत. .
First published:

पुढील बातम्या