उद्या नव्हे; आजच खरेदी करा गरजेची औषधे, कारण...

उद्या नव्हे; आजच खरेदी करा गरजेची औषधे, कारण...

राज्यभरातले मेडिकल स्टोअर्स आज मध्यरात्रीपासून शुक्रवार मध्यरात्रीपर्यंत बंद राहणार आहेत.

  • Share this:

मुंबई, 27 सप्टेंबर : राज्यभरातले मेडिकल स्टोअर्स आज मध्यरात्रीपासून शुक्रवार मध्यरात्रीपर्यंत बंद राहणार आहेत. ऑनलाईन औषध विक्रीला विरोध दर्शवण्यासाठी मेडिकल स्टोअर मालकांनी हा निर्णय घेतला आहे. संप एक दिवसाचाच असला, तरी रुग्णांचे हाल होण्याची शक्यता आहे.

ऑल इंडिया ऑर्गनाइजेशन ऑफ केमिस्ट एंड ड्रगिस्ट (एआईओसीडी)या संघटनेने देशात सुरू असलेल्या ऑनलाईन औषधी विक्री विरोधात दंड थोपटलेत. संघटनेने सर्व औषध विक्रेत्यांना उद्या म्हणजे शुक्रवारी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे आवाहन केलंय. सरकारने ई-फार्मेसीला चालना देण्यासाठी धोरण आखले असून, त्यामुळे औषध विक्रेत्यांसमोर धोका निर्माण झाला आहे. तसेच औषधांचाही दुरूपयोग होऊ शकतो असे एआईओसीडीचे सचिव तथा रिटेल डिस्ट्रब्यूटर्स केमिस्ट्स एसेासिएशनचे अध्यक्ष संदीप नांगिया यांनी म्हटलंय.

यापूर्वीसुद्धा एआईओसीडीने विविध माध्यमातून प्रशासनाच्या आणि संबंधिक विभागाच्या ही बाब बक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावर कोणताह गंभीर विचार न करता देशात ऑनलाईन औषध विक्रीचा व्यावसाय जोमात सुरू असून, त्यातून अवैध औषध विक्रीचे अनेक प्रकरणं समोर आले असल्याचे नांगिया यांनी म्हटलंय.

ऑनलाईन औषध विक्रीला विरोध दर्शवण्यासाठी मेडिकल स्टोअर मालकांनी यापूर्वीसुद्धा दोनदा देशव्यापी बंद पुकारला होता. सरकारने सकारात्मक पावले न उचलल्यामुळे आमच्यासमोर बंद शिवाय कुठलाच पर्याय नव्हता असे नांगिया यांनी म्हटले असून, याच दृष्टीकोनातून देशातील सर्व औषध विक्रेत्यांनी 28 सप्टेंबर रोजी बंद पुकारला असल्याचे नांगिया यांनी म्हटलंय.

औषधांचे दर ठरविण्याचा अधिकार सरकाला आहे. मग ऑनलाइन पोर्टलवर 70 टक्क्यांपर्यंत कशीकाय सुट दिली जाते. देशातले थोक औषध विक्रेतेसुद्धता 10 टक्क्यांपेक्षा जास्त सुट देत नाहीत. यातून नकली औषधांचा पुरवठा होण्याचीही शक्यता नाकारता येणार नसल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. तर केंद्रीय स्वास्थ्य मंत्रालयाने ताबडतोब ऑनलाईन औषध विक्री बंद करावी अशी मागणी संघटनेने केली आहे.

 VIDEO : ड्रोनच्या नजरेतून पुण्यातील पाण्याचा हाहाकार

First published: September 27, 2018, 8:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading