S M L

महाराष्ट्र फक्त सुरूवात;लवकरच शेतकरी मोर्चा दिल्लीत धडकणार

त्यामुळे या सर्व समस्यांवर तोडगा निघण्यासाठी एप्रिलमध्ये किसान सभा दिल्लीत असाच मोर्चा काढेल. देशातील सर्व राज्यांचे शेतकरी या मोर्च्यात सहभागी होतील.

Chittatosh Khandekar | Updated On: Mar 12, 2018 07:17 PM IST

महाराष्ट्र फक्त सुरूवात;लवकरच शेतकरी मोर्चा दिल्लीत धडकणार

12 मार्च  : 30,000 शेतकऱ्यांनी सहा दिवस काढलेला 180 किं.मी चालत प्रवास करून अखेर यशस्वी केलेला शेतकरी मोर्चा आज अखेर यशस्वी झाला. आपल्या हक्कांसाठी थेट मुंबई गाठणाऱ्या शेतकऱ्यांना सगळ्याच  स्तरातून ,सर्व विचारधारांच्या लोकांनी पाठिंबा दिला.पण आता  लवकरच संपूर्ण देशातल्या शेतकऱ्यांचा महामोर्चा दिल्लीत धडकणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अशी अजून काही  शेतकरी आंदोलनं बाकीच्या राज्यांमध्ये येत्या काळात होऊ शकतात. जमिनीचे हक्क ,कर्जमाफी, हमीभाव हे फक्त महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे नाही तर देशभरातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत .त्यामुळे या सर्व समस्यांवर तोडगा निघण्यासाठी एप्रिलमध्ये किसान सभा दिल्लीत असाच मोर्चा काढेल. देशातील  सर्व राज्यांचे शेतकरी या मोर्च्यात सहभागी होतील. काही महिन्यांपूर्वी देशातील सर्व राज्यातील शेतकऱ्यांनी दिल्लीत सरकारविरूद्ध निदर्शनं केली होती. मागच्यावर्षी मध्यप्रदेश ,तामिळ नाडू ,महाराष्ट्र या राज्यातील शेतकऱ्यांनी राज्यव्यापी संप केले होते. पण आता मात्र मागण्या पूर्ण होईपर्यंत ठिय्या आंदोलन काढलं जाऊ शकतं.

सध्या देशभर शेतकऱ्यांच्या मनात असंतोष आहे. या साऱ्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होऊन त्यांना न्याय मिळतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 12, 2018 07:17 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close