नवी दिल्ली, 11 मे : कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असताना रेल्वेनं 12 मेपासून भारतीय रेल्वे हळूहळू प्रवासी सेवा पुन्हा सुरू करण्याची योजना आखत आहे. सुरुवातीला 15 मार्गावरील सेवा सुरू होतील (30 रिटर्न फेऱ्या). यानंतर भारतीय रेल्वे आणखी स्पेशल सेवा नवीन मार्गांवर सुरू करेल. परंतु कोव्हिड-19 सेवा केंद्रे म्हणून राखीव ठेवलेले 20 हजार कोचेस तसेच दर दिवशी 300 गाड्या श्रमिक स्पेशल म्हणून राखीव ठेवल्यानंतर उरलेल्या डब्यांवर आधारित नवीन मार्ग ठरवले जातील. आज संध्याकाळी 4 वाजल्यापासून या विशेष ट्रेनसाठी बुकिंग सुरू करण्यात आले आहे. याशिवाय कोणत्या शहरातून ही सेवा सुरू होणार यासह जाणून घ्या 10 महत्त्वाच्या गोष्टी-
1. भारतीय रेल्वेच्या योजनेनुसार 12मेपासून प्रवासी सेवा पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. सुरुवातीला 15 मार्गावरील रेल्वे सेवा सुरू होईल.
2. या रेल्वे स्पेशल रेल्वे म्हणून नवी दिल्ली स्टेशन वरून दिब्रुगड, आगरताळा, हावडा, पटना बिलासपुर, रांची, भुवनेश्वर, सिकंदराबाद, बंगळुरू पर्यंत असेल.
3. तसेच, चेन्नई, तिरुवनन्तपुरम, मडगाव, मुंबई सेंट्रल, अहमदाबाद आणि जम्मूतावी या शहरांतूनही रेल्वे सेवा सुरू सुरू होतील.
4. सुरुवातीला या ट्रेन नवी दिल्ली स्थानकापासून सुरू होतील. सोमवारी सायंकाळी 4 वाजल्यापासून ऑनलाइन बुकिंगला सुरुवात झाली आहे.
5. रेल्वे स्टेशनवरील आरक्षण खिडक्या बंद राहतील आणि तेथून कुठलीही तिकिटे (प्लॅटफॉर्म तिकीटासहित) विकली जाणार नाहीत.
6. केवळ असेच प्रवासी ज्यांच्याकडे वैध कन्फर्म तिकीट आहे त्यांना रेल्वे स्टेशनमध्ये प्रवेश दिला जाईल.
7. प्रवाशांना चेहरा झाकणे किंवा मास्क वापरणं बंधनकारक असणार आहे. तसेच, कोरोनाची लक्षणं नसलेल्या व्यक्तींनाच केवळ प्रवास करता येणार आहे.
8. यानंतर भारतीय रेल्वे आणखी स्पेशल सेवा नवीन मार्गांवर सुरू करेल. परंतु कोव्हिड-19 सेवा केंद्रे म्हणून राखीव ठेवलेले 20 हजार कोचेस तसेच दर दिवशी 300 गाड्या श्रमिक स्पेशल म्हणून राखीव ठेवल्यानंतर उरलेल्या डब्यांवर आधारित नवीन मार्ग ठरवले जातील.
9. रेल्वेच्या वतीनं चालवण्यात येणाऱ्या ट्रेन या राजधानी ट्रेन असतील. सर्व कोच हे एसी असणार आहेत.
10. या विशेष गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या लोकांना ट्रेन येण्याच्या 2 तास आधी स्थानकात पोहचणे बंधनकारक असणार आहे.
हेही वाचा-आज संध्याकाळी 4 पासून सुरू होणार विशेष ट्रेनचं बुकिंग, घरबसल्या असं काढा तिकिट
हेही वाचा-गेल्या 24 तासांत रेकॉर्ड ब्रेक रुग्णांची नोंद, पाहा चिंता वाढवणारी आकडेवारी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: IRCTC, Train booking