काँग्रेसमध्ये ‘तरुण तुर्क’ आक्रमक, कार्यसमितीच्या बैठकीत बदलाचे संकेत

काँग्रेसमध्ये ‘तरुण तुर्क’ आक्रमक, कार्यसमितीच्या बैठकीत बदलाचे संकेत

बिहार आणि बंगालच्या निवडणुका जवळ आलेल्या असतांना काँग्रेसमध्ये अध्यक्षपदाचा घोळ सुरु आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 23 ऑगस्ट: काँग्रेसच्या कार्यसमितीची सोमवारी (24 ऑगस्ट) बैठक होणार आहेत. त्यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा अध्यक्षपदाचा राहणार असल्याचे संकेत मिळत आहे. सोनिया गांधी यांना आता जास्त काळ कार्यकारी अध्यक्षपदावर राहण्याची इच्छा नाही. मात्र पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांनीच कायम राहावं असं म्हटलंय. तर तरुण नेत्यांना राहुल गांधी यांनी अध्यक्षपदावर यावं असं वाटतं. त्यामुळे पक्षात ज्येष्ठ आणि तरुण असा संघर्ष पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे.

या बैठकीच्या पार्श्वभूमीवर तरुण नेत्यांनी आक्रमक भूमिका स्वीकारली असून वर्षानुवर्ष पदावर असलेल्या लोकांमळे पक्षाची अधोगती झाल्याची टीका तरुण नेत्यांनी केली आहे. तर तरुणांनी संयम ठेवावा असं मत कपील सिब्बल यांच्या सारख्या नेत्यांनी व्यक्त केलंय. त्यामुळे सोमवारी सोनिया गांधी काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे.

काँग्रेसला पूर्ण वेळ अध्यक्ष हवा ही मागणी जोर धरत असतांनाच सोनिया गांधी या हंगामी अध्यक्षपद सोडणार असल्याची चर्चा आहे. मात्र काँग्रेसने त्या अफवा असल्याचं स्पष्ट केलं. मात्र तरीही चर्चा काही थांबलेली नाही. काँग्रेस कार्यसमितीने नवा अध्यक्ष निवडावा असं सोनिया गांधी यांनी सांगितलं आहे.

राहुल आणि प्रियंका गांधी यांनी या आधीच अध्यक्षपद स्वीकारणार नसल्यांच स्पष्ट केलं आहे. त्यामुळे नवा अध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता आहे.

कोण होणार काँग्रेसचा नवा अध्यक्ष? महाराष्ट्रातल्या नेत्याचं नाव चर्चेत

मात्र काँग्रेसचे सर्व मुख्यमंत्री आणि नेते हे राहुल गांधी यांना आग्रह करण्याची शक्यता आहे. मात्र राहुल सध्या अध्यक्षपद स्वीकारण्याच्या मन:स्थितीत नाहीत असं बोललं जातंय.

काँग्रेस कार्यसमितीने गांधी घराण्याव्यशिवाय इतर नावांवर विचार करावा असंही राहुल गांधी यांनी सुचवलं होतं.

त्यामुळे आता इतर नेत्यांच्या नावांचा विचार करण्यात येत आहे. त्यात गुलाब नबी आझाद, ऐ.के अन्टोनी, मोतीलाल व्होरा यांच्या नावाची चर्चा आहे.

"एका फोनमुळे मला बळ मिळतं", कोरोना वॉरिअर केरळच्या आरोग्यमंत्र्यांचा एक दिवस

या नावांमध्ये महाराष्ट्रातले ज्येष्ठ काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे यांचही नावं घेतलं जातं. उपराष्ट्रपती पदासाठी काँग्रेसने शिंदे यांना उमेदवारी दिली होती.

मात्र अध्यक्ष निवडीसाठी काँग्रेसची कसोटी लागणार असून मोठी उलथापालथ होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

बिहार आणि बंगालच्या निवडणुका जवळ आलेल्या असतांना काँग्रेसमध्ये अध्यक्षपदाचा घोळ सुरु आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: August 23, 2020, 10:32 PM IST

ताज्या बातम्या