न जाने क्यूँ , एक अजीबसी घबराहट हो रही है- अमिताभ बच्चन

न जाने क्यूँ , एक अजीबसी घबराहट हो रही है- अमिताभ बच्चन

सुपरस्टार अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनानं सगळ्यांनाच कमालीचा धक्का बसलाय. अख्खी सिनेसृष्टी हादरलीय. पंतप्रधानांनीही ट्विट करून श्रीदेवींना श्रद्धांजली वाहिलीय.

  • Share this:

25 फेब्रुवारी : सुपरस्टार अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनानं सगळ्यांनाच कमालीचा धक्का बसलाय. अख्खी सिनेसृष्टी हादरलीय. पंतप्रधानांनीही ट्विट करून श्रीदेवींना श्रद्धांजली वाहिलीय. तर बिग बींच्या ट्विटची तर खूप चर्चा सुरू आहे. पाहू या अशाच काही ट्विट्स

पंतप्रधान नरेंद्र मोदी

सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवींच्या अकाली निधनानं अतीव दुःख झालं. चित्रपटसृष्टीतल्या त्या दिग्गज अभिनेत्री होत्या. त्यांनी अनेक प्रकारच्या भूमिका केल्या, त्यांची अनेक पात्र अजरामर झाली. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.

अमिताभ बच्चन यांनी मध्यरात्री केलेलं ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

न जाने क्यूँ , एक अजीब सी घबराहट हो रही है

रजनीकांत

मला खूप मोठा धक्का बसलाय, मी डिस्टर्ब झालोय. मी एका प्रिय मैत्रिणीला गमावलंय आणि चित्रपटसृष्टीनं एका दिग्गज अभिनेत्रीला गमावलंय. त्यांच्या कुटुंबीयांचं दुःख मी समजू शकतो.. तुझ्या आत्म्यास शांती मिळो, तुझी खूप आठवण येईल.

कमल हासन

श्रीदेवींचं आयुष्य मी अगदी पहिल्यापासून पाहिलंय. एक साधी तरुणी ते दिग्गज अभिनेत्री हा त्यांचा प्रवास थक्क करणारा होता. त्यांच्यासोबत अनेक चांगले क्षण व्यतीत केले, ते सगळे मला आता आठवतायेत. सदमामधलं ते अंगाईगीत मला अजूनही आठवतं.. त्यांची खूप आठवण येईल

रवीना टंडन

सकाळी उठले आणि खूप मोठा धक्का बसला ! अतिशय वाईट बातमी ! मला शब्दच सुचत नाहीयेत. काही कळतच नाहीये ! असं का झालं ? खूप लवकर गेल्या त्या... बोनीजी, जान्हवी आणि खुशीचा विचार करून खूप वाईट वाटतंय. सांत्वन आणि प्रार्थना. #श्रीदेवी.

राम गोपाल वर्मा

श्रीदेवी खरंच गेल्या का ? कुणी मला जागं करून सांगेल का की हे मला पडलेलं वाईट स्वप्न आहे ? कुणी मला सांगेल का, त्या अशा कशा काय जाऊ शकतात ?

प्रियांका चोप्रा

माझ्याकडे शब्दच नाहीयेत. ज्यांनी ज्यांनी श्रीदेवींवर प्रेम केलं, त्यांचं मी सांत्वन करते. काळा दिवस. ये लम्हे, ये पल हम हर पल याद करेंगे. ये मौसम चले गए तो हम फरियाद करेंगे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.

रितेश देशमुख

अतिशय, अतिशय वाईट बातमी. मला जो धक्का बसला आहे, तो शब्दांपलिकडचा आहे.

जॉनी लीवर

श्रीदेवीजींबद्दल ऐकून खूप वाईट वाटलं आणि धक्का बसला. त्यांच्या परिवाराचं सांत्वन.

अदनान सामी

माझ्याकडे शब्दच नाहीत..इतक्या रात्री ही वाईट बातमी वीजेसारखी कोसळली. खूप दुःख झालंय. त्या महान कलाकार होत्या आणि माणूस म्हणून खूप सुंदर होत्या. खूप लवकर गेल्या.

First published: February 25, 2018, 9:12 AM IST

ताज्या बातम्या