मक्का बॉम्बस्फोट प्रकरणाचा 11 वर्षांनंतर फैसला, सर्व आरोपी निर्दोष

मक्का बॉम्बस्फोट प्रकरणाचा 11 वर्षांनंतर फैसला, सर्व आरोपी निर्दोष

2007मध्ये शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी झालेल्या स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला तर 58 जण जखमी झाले होते. या प्रकरणात स्वामी असीमानंद हे मुख्य आरोपी होते.

  • Share this:

16 एप्रिल : 2007 साली हैदराबादमध्ये झालेल्या मक्का बॉम्बस्फोट प्रकरणी 11 वर्षांनंतर आज अखेर फैसला सुनावण्यात आला आहे. पुराव्या अभावी यात दोषी असलेल्या पाचही जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

एनआयए ठोस पुरावे सादर न करू शकल्यानं या सर्वांना निर्दोष सोडण्यात आलं आहे. 2007मध्ये शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी झालेल्या स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला तर 58 जण जखमी झाले होते. या प्रकरणात स्वामी असीमानंद हे मुख्य आरोपी होते.

कधी झाला होता मक्का बॉम्बस्फोट ?

18 मे, 2007 रोजी शुक्रवारी नमाजावेळी हैदराबादच्या मक्का मशिदेत एक स्फोट झाला. या स्फोटात 9 लोकं मारले गेले होते. तर 58 जण जखमी झाले होते. या घटनेनंतर पोलिसांनी आंदोलकांना रोखण्यासाठी हवाई मार्गे फायरिंगही केली होती. त्यात 5 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेत एकूण 160 साक्षीदारांची नोंद नोंदवण्यात आली होती.

कोण होते आरोपी?

या घटनेचा तपास केल्यानंतर 10 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. यामध्ये अभिनव भारतच्या सर्व सदस्यांचा समावेश होता. या प्रकरणात स्वामी असीमानंद, देवेंद्र गुप्ता, लोकेश शर्मा उर्फ अजय तिवारी, लक्ष्मण दास महाराज, मोहनलाल रतेश्वर आणि राजेंद्र चौधरी यांना आरोपी घोषित करण्यात आले होते.

या प्रकरणातले 2 आरोपी रामचंद्र कालसांगरा आणि संदीप डांगे हे अद्याप फरार आहेत. या प्रकरणी प्रमुख आरोपी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते सुनील जोशी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

 

First published: April 16, 2018, 1:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading