अलवर गँगरेप प्रकरणातील मुख्य आरोपीसह 5 जण अटकेत

अलवर गँगरेप प्रकरणातील मुख्य आरोपीसह 5 जण अटकेत

अलवर सामुहिक बलात्कार प्रकरणात आता सर्व आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

  • Share this:

अलवर, 10 मे : अलवर सामुहिक बलात्कार प्रकरणातील सर्व आरोपींना पोलिसांनी आता बेड्या ठोकल्या आहेत. अटकेनंतर या आरोपींनी हो आमच्याकडून चुक झाली अशी कबुली दिली आहे. या प्रकरणात गुरुवारी पोलिसांनी हंसराजला अटक केली होती. तर, संध्याकाळी मुख्य आरोपी छोटेलाल गुर्जरला देखील अटक केली. महिलेवर तिच्या पतीसमोर सामुहिक बलात्कार  करत व्हिडीओ देखील तयार करण्यात आला होता. यामध्ये पाच बलात्कारी आणि एका व्हिडीओ बनवणाऱ्याला देखील बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. आरोपींनी आपला गुन्हा कबुल केला आहे. त्यांच्या कबुली जबाबावरून पोलिसांनी आता गुन्हा दाखल केला असून आरोपींना काय शिक्षा होणार? याकडे सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे. दरम्यान, याप्रकरणामध्ये आता राजकीय आरोप – प्रत्यारोप देखील रंगले आहेत.


30 वर्षांनी लहान महिला को- पायलटचं ऐकलं नाही म्हणून झाला एअर इंडियाचा 'तो' अपघात

पतीसमोर बलात्कार, तयार केला व्हिडीओ

राजस्थानमधील अलवर येथे सामूहिक बलात्काराचा धक्कादायक प्रकार 7 मे रोजी उघडकीस आला होता. पाच नराधमांनी मिळून एका महिलेवर तिच्या पतीसमोरच बलात्कार केला. ही धक्कादायक घटना एवढ्यापुरती मर्यादित राहिली नाही. या घटनेची तक्रार नोंदवून घेण्यास पोलिसांनी चार दिवस टाळाटाळ केली. पोलिसांनी निवडणुकीच्या कामाचे कारण सांगत ही संपूर्ण घटना दाबून टाकली होती.

अलवर जिल्ह्यातील थानागाजी परिसरात ही घटना घडली आहे. एका महिलेवर तिच्या पतीसमोरच अत्याचार करण्यात आला. हा प्रकार घडत असताना आरोपींनी त्याचा व्हिडिओ देखील तयार केला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला. पीडित महिला 26 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता पतीसह मोटरसायकलवरून लालवाडीहून तालवृक्षकडे जात होती. थानागाजी-अलवर बायपास रोडवर दुहार चौगान या रस्त्यावर दोन दुचाकीवरून आलेल्या 5 युवकांनी त्यांना थांबवले. हे सर्व युवक 20 ते 25 वयोगटातील होते. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार त्या युवकांनी पतीला मारहाण केली आणि त्याला बांधून ठेवले. त्यानंतर अत्याचार केला.


VIDEO: 'जाणता राजाला येऊ दे नाही तर पंटरला येऊ दे' पाटलांचं पवारांना ओपन चॅलेंज

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 10, 2019 04:57 PM IST

ताज्या बातम्या