काळजाचा थरकाप...फक्त 5 हजारांसाठी अडीच वर्षांच्या मुलीची हत्या

हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह त्यांनी कचऱ्याच्या पेटीत टाकून दिला. दोन दिवसानंतर कुत्र्यांनी तो मृतदेह रस्त्यावर आणला तेव्हा घटना उघडकीस आली.

News18 Lokmat | Updated On: Jun 7, 2019 07:10 PM IST

काळजाचा थरकाप...फक्त 5 हजारांसाठी अडीच वर्षांच्या मुलीची हत्या

लखनऊ 7 जून : उत्तर प्रदेशातल्या अलीगडमध्ये काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडलीय. फक्त 5 हजारांसाठी ओळखीच्या दोन जणांनी एका अडीच वर्षांच्या मुलीची हत्या करून तिचा मृतदेह कचऱ्याच्या पेटीत टाकून दिला. मुलीच्या वडिलाने कर्ज म्हणून घेतलेले पैसे परत न केल्याने नराधमांनी हे कृत्य केलं. या प्रकरणी दोन जणांना पोलिसांनी अटक केलीय.

अलीगड जवळच्या टप्पल भागात ही घटना घडलीय. मुलीच्या वडिलांनी जाहीद या शेजाऱ्याकडून काही कामासाठी  10 हजारांचं कर्ज घेतले होतं. त्यातले 5 हजार त्यांनी परत केले मात्र 5 हजार देणं त्यांना शक्य होत नव्हतं. त्यामुळे जाहीद आणि त्याचा मित्र असलम याने त्यांच्या अडीच वर्षांच्या मुलीचं अपहरण केलं आणि तिची हत्या केली.

हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह त्यांनी कचऱ्याच्या पेटीत टाकून दिला. दोन दिवसानंतर कुत्र्यांनी तो मृतदेह रस्त्यावर आणला तेव्हा घटना उघडकीस आली. मुलीची गळा दाबून हत्या करण्यात आली होती असं पोस्टमार्टेममध्ये उघड झालंय. पोलिसांनी प्रकरणाच्या तापासासाठी विशेष टीम तयार केली होती. त्यानंतर हे सगळं प्रकरण उघडकीस आलं. या प्रकरणी असलम आणि जाहीद या दोघांनाही राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक करण्यात आली आहे.

या दोनही आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी देशभरातून होत आहे. माणूसकीला काळीमा फासणाऱ्या या आरोपींना फाशीची शिक्षा झाली तरच पुन्हा कोणी असं कृत्य करण्याचं धाडस करणार नाही अशी प्रतिक्रिया पीडित मुलीच्या आईने व्यक्त केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 7, 2019 07:10 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...