Pulwama Attack : काश्मीरी विद्यार्थ्याचे वादग्रस्त ट्विट, विद्यापीठाने केलं निलंबित

Pulwama Attack : काश्मीरी विद्यार्थ्याचे वादग्रस्त ट्विट, विद्यापीठाने केलं निलंबित

उरी चित्रपटातील How's the Josh या डायलॉगचा वापर करुन केलं होतं वादग्रस्त ट्विट

  • Share this:

अलीगढ, 16 फेब्रुवारी : पुलवामात सीआरपीएफ जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीच्या एका विद्यार्थ्याने वादग्रस्त ट्विट केले. त्यानंतर प्रशासनाने त्याला विद्यापीठातून काढून टाकण्यात आलं आहे. त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

पुलवानमा हल्ल्यानंतर अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीतील बीएस्सीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या समर्थनार्थ टि्वट केलं होतं. बसीम हिलाल असे त्या विद्यार्थ्याचे नाव असीन पुलवामा हल्ल्याची जबाबदारी घेतलेल्या संघटनेचं समर्थन करणारे ट्विट केल्यानं त्याला विद्यापीठातून काढून टाकण्यात आलं आहे.

बसीम हिलालने केलेल्या ट्विटमध्ये उरी चित्रपटातील How's the Josh या डायलॉगचा वापर करताना जोश ऐवजी जैश असं लिहलं आहे. त्यानंतर त्याने ग्रेट सर असं लिहून जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचं समर्थन केलं आहे. त्याचं ट्विटर हँडल सध्या सस्पेंड करण्यात आलं आहे.

बसीम हिलाल याने केलेलं ट्विट व्हायरल झाल्यानंतर उत्तर प्रदेश पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा सावध झाल्या. त्यानंतर शुक्रवारी पोलिसांनी हिलालविरुद्ध आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत विद्यापीठाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, आम्हाला हिलालच्या वादग्रस्त टि्वटची माहिती मिळाली. त्यावत तातडीने कारवाई करत विद्यापीठ प्रशासनाने हिलालला निलंबित केलं आहे. विद्यापीठाची प्रतिमा खराब होऊ नये यासाठी हे पाऊल उचललं आहे. बसीम हिलाल हा काश्मीरचा असून विज्ञान शाखेत संख्याशास्त्र शिकत होता.

बसीमला अद्याप पोलिसांनी ताब्य़ात घेतलेलं नाही. तो अलीगढमध्ये नसल्याने त्याला अटक केली नसून पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

First published: February 16, 2019, 9:16 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading