Home /News /national /

बापरे! डॉक्टरांनी तरुणावर केली यशस्वी शस्त्रक्रिया, पोटातून काढली 24 किलोची गाठ

बापरे! डॉक्टरांनी तरुणावर केली यशस्वी शस्त्रक्रिया, पोटातून काढली 24 किलोची गाठ

अलीगढ जिल्ह्यातील छर्रा येथील रहिवासी असलेले 45 वर्षीय सीताराम जवळजवळ दीड वर्षांपासून त्यांच्या पोटात हा ट्यूमर घेऊन फिरत होते.

    नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर : अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीमधील (AMU) जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज (JNMC) मधील डॉक्टरांनी एका रूग्णाच्या पोटातून 24 किलो वजनाची गाठ (ट्युमर) यशस्वीरित्या काढली आहे. अलीगढ जिल्ह्यातील छर्रा येथील रहिवासी असलेले 45 वर्षीय सीताराम जवळजवळ दीड वर्षांपासून त्यांच्या पोटात हा ट्यूमर घेऊन फिरत होते. प्रा. सय्यद हसन हॅरिस (सर्जरी विभाग) यांच्या देखरेखीखाली डॉ. शाहबाज हबीब फरीदी यांच्या नेतृत्वात सर्जन्सच्या पथकाने, एका कठीण सर्जरीद्वारे, हा ट्युमर पोटातून काढून टाकला. प्रा. हसन हॅरिस म्हणाले, "सीताराम हे 2018 पासून त्यांच्या ट्यूमरच्या वेदनांनी त्रस्त होते. त्यावेळी, त्यांच्या पोटात दुखायचं, परंतु ते कशामुळे हे त्यांना माहीत नव्हते. वेदनांचे उपचार करण्यासाठी त्यांनी पेनकिलर घेतल्या. त्यांच्या पोटाच्या एका बाजूकडे दुखून मग दुसर्‍या बाजूकडे व नंतर पोटाच्या मध्यभागी दुखणं जायचं, ज्यामुळे त्यांना दैनंदिन कामंही करणं कठीण झालं होतं." हे वाचा-खूशखबर! पुण्याच्या सीरम कंपनीने तयार केलेली कोरोना लस 70 टक्के परिणामकारक ते पुढे म्हणाले की सीताराम यांनी उत्तर प्रदेश आणि दिल्लीतील रुग्णालयांमध्ये उपचारही घेतले होते पण त्याचा काही उपयोग झाला नाही. खासगी मोठी रुग्णालयं अत्याधिक फी मागत होती आणि महामारीच्या रूग्णांच्या लोडमुळे अनेक छोटी हॉस्पिटल त्यांना उपचार देत नव्हती. प्रो. हसन हॅरिस म्हणाले, "जेव्हा सीताराम JNMC ला पोहोचले तेव्हा आम्ही ताबडतोब त्यांची प्री-सर्जरी तपासणी केली. चाचण्यांमध्ये असे दिसून आले की सर्जरी हा एकमेव पर्याय होता, जो दुर्मीळ आणि धोकादायक होता कारण हा घातक ट्यूमर त्यांच्या मुख्य अवयवांना दाबत होता." शिवाय, सर्जरीच्या प्रक्रियेसाठी जवळजवळ 80 टक्के पोटात उपचार प्रक्रिया करणे आवश्यक होते आणि जास्त रक्त वाहून जाण्याची शक्यता होती. अखेर चार तासांच्या सर्जरीनंतर ट्यूमर काढून टाकण्यात आला आणि सीताराम आता बरे होत आहेत. AMU चे कुलगुरू, प्रा. तारिक मन्सूर म्हणाले, "ट्यूमर इतक्या प्रमाणात वाढलेला दिसणे फारच क्वचित घडतं, परंतु डॉक्टरांनी रूग्णाला आवश्यक तसे उपचार करून त्याला नवीन जीवन दिलं."आधुनिक तंत्रज्ञान आणि विज्ञान यांचा मेळ असलेला हा एक चमत्कारच जणू घडला आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Uttar pradesh

    पुढील बातम्या