अलिगढ हत्याकांड : आरोपींनी खून करून फ्रिजमध्ये ठेवला चिमुरडीचा मृतदेह

अलिगढ हत्याकांड : आरोपींनी खून करून फ्रिजमध्ये ठेवला चिमुरडीचा मृतदेह

उत्तर प्रदेशातल्या अलिगढमध्ये घडलेल्या हत्याकांडामुळे अवघा देश हादरून गेला आहे. टप्पलमध्ये अवघ्या अडीच वर्षांच्या चिमुरडीचा निर्घुणपणे खून करण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी आणखी दोन आरोपींना अटक केली आहे.

  • Share this:

अलिगढ, 8 जून : उत्तर प्रदेशातल्या अलिगढमध्ये घडलेल्या हत्याकांडामुळे अवघा देश हादरून गेला आहे. टप्पलमध्ये अवघ्या अडीच वर्षांच्या चिमुरडीचा निर्घुणपणे खून करण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी आणखी दोन आरोपींना अटक केली आहे. मोहम्मद जाहिद आणि मोहम्मद असलम या दोघांनी या छोट्या मुलीच्या कुटुंबाचा बदला घेण्यासाठी ही हत्या केली.

पोलिसांना संशय

या आरोपींनी या चिमुरडीचा खून करून तिचा मृतदेह फ्रिजमध्ये ठेवला असावा, असाही एसआयटीच्या पोलीस अधिकाऱ्यांना संशय आहे.

या प्रकरणामध्ये पकडलेल्या आरोपींची संख्या 4 झाली आहे. मोहम्मद जाहिद याची पत्नी शाहिस्ताने या मुलीचा मृतदेह तिच्या ओढणीत गुंडाळून ठेवला होता.

पैशाच्या वादातून झाली हत्या

अलिगढमधल्या टप्पल भागात पैशांवरून झालेल्या वादातून अडीच वर्षांच्या मुलीचा खून झाल्याची घटना घडली होती. या मुलीच्या वडिलांनी तक्रार केल्यानंतर जाहिद आणि असलमला अटक केली होती. या प्रकरणातल्या आरोपींवर पॉक्सो कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असं पोलिसांनी सांगितलं.

पोलिसांवरही कारवाई

या प्रकरणात तक्रार नोंदवून घ्यायला दिरंगाई केल्याबद्दल पाच पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाईही करण्यात आली आहे.

पैशाच्या वादातून लहानगीचा बळी गेल्यामुळे सगळीकडे हळहळ व्यक्त होत आहे.

====================================================================================================

VIDEO : विधानसभेत कुणाविरोधात वंचित लढणार? प्रकाश आंबडेकरांनी UNCUT मुलाखत

First published: June 8, 2019, 7:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading