Home /News /national /

कोरोना नाही तर, डेंग्यूच्या रुग्णामध्ये आढळलं Black Fungus; इंदौरमध्ये सापडले दोन रुग्ण

कोरोना नाही तर, डेंग्यूच्या रुग्णामध्ये आढळलं Black Fungus; इंदौरमध्ये सापडले दोन रुग्ण

पुन्हा एकदा चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. कोरोनानंतर हाहाकार माजवणारा ब्लॅक फंगस (black fungus) पुन्हा एकदा डोकवर काढताना दिसत आहे.

    इंदौर, 30 ऑक्टोबर: पुन्हा एकदा चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. डेंग्यूबाबत (Dengue) प्रशासनाची चिंता कमी झाली नसताना दुसरीकडे आणखी एका नव्या प्रकरणानं आरोग्य प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. कोरोनानंतर हाहाकार माजवणारा ब्लॅक फंगस (black fungus) पुन्हा एकदा डोकवर काढताना दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा ब्लॅक फंगस आता डेंग्यूच्या रुग्णांमध्ये आढळून येत आहे. इंदौरमधील 50 वर्षीय रुग्णामध्ये हा प्रकरण आढळून आलं आहे. आठवडाभरापूर्वी डेंग्यूने बरा झालेल्या धार जिल्ह्यातील या रुग्णाला आता म्युकरमायकोसिसची (Mucormycosis) लक्षणे दिसू लागली आहेत. हेही वाचा- Aryan Khan तुरुंगातील 28 दिवस...क्रूझ, तुरुंग शेवट 'मन्नत' वर; अशी आहे Timeline विशेष म्हणजे, इंदौरमधील ही पहिलीच घटना आहे, ज्यामध्ये डेंग्यूनंतर रुग्णामध्ये ब्लॅक फंगस दिसून आलं आहे. संपूर्ण राज्यातील ही दुसरी घटना आहे. लाईव्ह हिंदुस्तानमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, या व्यक्तीवर सध्या इंदौरमधील चोइथराम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या व्यक्तीला 15 ऑक्टोबर रोजी ब्लॅक फंगसची लक्षणे दिसू लागल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या रुग्णानं आठवडाभरापूर्वीच डेंग्यूवर मात केली होती. हेही वाचा-  T20 World Cup: अफगाणिस्तानच्या कॅप्टनला विचारला तालिबानवर प्रश्न, पाहा नबीनं काय दिलं उत्तर VIDEO सल्लागार ईएनटी डॉक्टर अभिक सिकधर यांनी सांगितलं की, रुग्णाच्या नाकाची एन्डोस्कोपी करून कॅविटी काढण्यात आली आहे.संसर्गामुळे त्याला अद्याप स्पष्ट दिसत नसलं तरी त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहेत. जबलपूरमध्येही आढळला एक रुग्ण ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात जबलपूरमध्येही असाच एक प्रकार समोर आला होता. येथेही डेंग्यूमधून बरे झाल्यानंतर एका रुग्णाला ब्लॅक फंगसची लागण झाली होती. इंदौरच्या एमवाय रुग्णालयामध्ये म्युकरमायकोसिसचे 12 रुग्ण दाखल आहेत. या सर्व रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे आणि त्यानंतर त्यांना कोणत्यातरी गंभीर आजाराने घेरलं आहे. आता हे सर्व रुग्ण या गंभीर आजाराच्या विळख्यात सापडलेत.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Coronavirus, Indore

    पुढील बातम्या