मराठी बातम्या /बातम्या /देश /मद्यपींनी बिघडवले गावातील वातावरण, स्थानकांनी लढवली ही शक्कल अन् घेतला हा निर्णय

मद्यपींनी बिघडवले गावातील वातावरण, स्थानकांनी लढवली ही शक्कल अन् घेतला हा निर्णय

छत्तीसगडमधलं हे पहिलं गाव असेल, जिथे गावकऱ्यांनीच दारूबंदीचा निर्णय घेतला असेल.

छत्तीसगडमधलं हे पहिलं गाव असेल, जिथे गावकऱ्यांनीच दारूबंदीचा निर्णय घेतला असेल.

छत्तीसगडमधलं हे पहिलं गाव असेल, जिथे गावकऱ्यांनीच दारूबंदीचा निर्णय घेतला असेल.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Chhattisgarh, India

बालोद, 6 ऑगस्ट : छत्तीसगडच्या बालोद येथून एक विचित्र बातमी आहे. येथे गावकऱ्यांनी अवैध दारू विक्री आणि मद्यपींच्या मुसक्या आवळण्याचा अनोखा मार्ग शोधून काढला. असा मार्ग, ज्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हे प्रकरण घुमका गावातील आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण -

छत्तीसगडमधलं हे पहिलं गाव असेल, जिथे गावकऱ्यांनीच दारूबंदीचा निर्णय घेतला असेल. बालोद जिल्हा मुख्यालयापासून 10 किमी अंतरावर असलेल्या या गावाची लोकसंख्या तीन हजार आहे. येथे लोक आनंदाने आणि आपलेपणाने राहतात. कोणाची कोणावरही तक्रार नव्हती. पण, दारूने या गावातील वातावरण बिघडवले. याचा परिणाम तेथील महिला आणि मुलांवर होऊ लागला. पण, आता येथे दारूमुळे वाद होणार नाही. कारण, वाद करण्यापूर्वी शेकडो वेळा विचार करावा, असा निर्णय आता ग्रामस्थांनी घेतला आहे.

दोन दिवसांपूर्वी गावातील एका तरुणाने गावातील अवैध दारूविक्रेत्याविरोधात आवाज उठवला होता. गावातील लोकप्रतिनिधींशिवाय त्यांनी पोलीस ठाण्यातही तक्रार केली. त्यानंतर रागाच्या भरात अवैध दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीने फिर्यादीच्या घरी जाऊन त्याला धमकावले. या घटनेनंतर पीडितेने पुन्हा गावातील लोकप्रतिनिधींना तिच्यासोबत झालेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर रात्री 11 वाजता त्या विषयावर तातडीची बैठक घेण्याचे ठरले.

दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळी 7 वाजता गावात दवंडी देण्यात आली आणि व 4 तासांनंतर सकाळी 11 वाजता प्रत्येक घरातील एक महिला व पुरुष गावातील मुख्य चौकात जमा व्हावे, असे ठरले. या दिवशी कोणीही इतर कामासाठी जात नसल्याने गाव बंद होते. 11 वाजता गावातील सर्व लोक जमा झाले. बैठकीत महिलांना पुढे करण्यात आले. पंचायतीच्या लोकप्रतिनिधींनी तेथे उपस्थित सर्व लोकांना अवैधरित्या दारूविक्री करणाऱ्या लोकांसाठी पुढे येण्यास सांगितले. त्यानंतर 5 जणांनी स्वतः पुढे येऊन अवैधरित्या दारू विक्री केल्याची कबुली दिली.

त्यानंतर सभेला उपस्थित महिलांनी त्या पाच जणांकडून प्रत्येकी 2 हजार रुपये दंड वसूल केला. या शिक्षेनंतर या पाच जणांनी गावकऱ्यांना पुन्हा दारू विक्री न करण्याचे आश्वासन दिले. त्यावर तोडगा काढल्यानंतर पंचायतीच्या प्रतिनिधींनी त्यांच्यासोबत अवैध दारू विक्री करणाऱ्यांची यादी काढली. त्यापैकी 7 जणांची नावे होती, ती सार्वजनिक करण्यात आली. सात जणांकडून प्रत्येकी 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. त्यांनीही पुन्हा दारू विक्री न करण्याचे मान्य केले. दारू पिऊन शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तीकडून महिलांनी २० हजारांचा दंड वसूल केला. अशा प्रकारे महिलांनी ग्रामनिधीत 65 हजार रुपये जमा केले.

हेही वाचा - IT कंपनीतील तरुणीवर बलात्कार करुन हत्या, पोलीस हवालदारासह दोघांना अटक

जमा झालेल्या पैशातून आता गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. जेणेकरून, सर्वत्र आणि प्रत्येक व्यक्ती दिसू शकेल. यामुळे अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यांवर आणि गैरव्यवहार करणाऱ्यांवरही नजर राहणार आहे. दारू पिऊन कोणी दंगल केली तर त्याच्यावर 20 हजार रुपये दंड ठोठावला जाईल, असे गावकऱ्यांनी ठरवले आहे. बेकायदेशीरपणे दारू विकणाऱ्याला 51 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

First published:
top videos

    Tags: Chhattisgarh