खराब अक्षरासाठी कोर्टानं तीन डॉक्टरांना ठोठावलाय दंड

खराब अक्षरासाठी कोर्टानं तीन डॉक्टरांना ठोठावलाय दंड

अलाहाबाद हायकोर्टानं खराब अक्षरासाठी तीन डॉक्टरांना प्रत्येकी 5 हजार रुपयांचा दंड ठोठावलाय.

  • Share this:

संदीप राजगोळकर, कोल्हापूर, 4 ऑक्टोबर - एखाद्याचं अक्षर खराब असेल तर 'तू डॉक्टर का नाही झालास?' असा टोमणा मारला जातो. डॉक्टरांकडून दिल्या जाणाऱ्या प्रिस्क्रिप्शनवरचं अक्षर समजणं तसं महा महाकठीण काम. कुणालाच न कळणारं ते अक्षर काही डॉक्टरांना अभिमानाचा विषय वाटतो. मात्र, अलाहाबाद हायकोर्टानं खराब अक्षरासाठी तीन डॉक्टरांना प्रत्येकी 5 हजार रुपयांचा दंड ठोठावलाय. यामुळे वैद्यकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

औषधांसाठी डॉक्टरांनी लिहून दिलेलं प्रिस्क्रिप्शन सहस समजणारा रुग्ण औषधाला देखील शोधून सापडणार नाही. लहानपणी तुमच्या अक्षराचे वाभाडे काढण्यासाठी शिक्षकांनी 'कोंबड्याचे पाय', 'गिचमिड' अशा नाना प्रकारच्या उपमा दिल्या असतील. मात्र, डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनचं वर्णन करण्यासाठी या उपमा देखील कमी पडतील.

उत्तर प्रदेश न्यायालयानं दिलेल्या एका निर्णयानंतर वैद्यकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. खराब अक्षरात प्रिस्क्रिप्शन लिहून देणाऱ्या 3 डॉक्टरांना अलाहाबाद उच्च न्यायालयानं प्रत्येकी 5 हजार रुपयांचा दंड ठोठावलाय. उत्तर प्रदेशातल्या सितापूर, उन्नाव, गोंडा या तीन जिल्ह्यातल्या रुग्णांचा मेडिकल रिपोर्ट तयार करण्यात आला होता. मात्र रिपोर्टवरचं अक्षर समजण्यापलिकडचं होतं. या प्रकरणाची दखल घेत अलाहाबाद हायकोर्टानं हा मेडिकल रिपोर्ट तयार तीन डॉक्टरांना प्रत्येकी 5 हजार रुपयांचा दंड ठोठावलाय. त्यावर कामाच्या ताणावामुळं अक्षर खराब आहे, अशी लंगडी सबब डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. तर भविष्यात मेडिकल रिपोर्ट हे टाईप केलेलेच असावेत असे आदेशही अलाहाबाद उच्च न्यायालयानं दिलेत.

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर महाराष्ट्रातल्या डॉक्टरांनीदेखील धडा घेणं गरजेचं आहे. कारण प्रिस्क्रिप्शन समजताना औषध विक्रेते आणि रूग्णांच्या नाकीनऊ आलेले असतात असं स्पष्ट मत कोल्हापूराती काहींनी व्यक्त केलंय. जेव्हा-जेव्हा समजेल अशा अक्षरात लीहा अशी विनंती करण्यात आली, तेव्हा-तेव्हा औषध विक्रेत्यांच्या वाट्याला उद्धट उत्तरं आली असल्याची प्रतिक्रिया काहिंनी न्यूज18 लोकमतकड व्यक्त केली.

डॉक्टरांचं अक्षर समजत नसल्यामुळं अनेकवेळा रूग्णांना आपण विकत घेतलेलं औषध योग्य आहे, की नाही हे कळतच नाही. औषध विक्रेत्यांकडूनही चुकीचं औषध दिली जाण्याची शक्यता बळावते. उत्तर प्रदेश सरकारप्रमाणे महाराष्ट्र सरकारनं देखील सुवाच्च अक्षर काढण्यासाठी डॉक्टरांना कायद्याची मात्रा देणं गरजेचं झालं आहे.

 मुकेश अंबानी सलग ११ व्या वर्षी सर्वात श्रीमंत भारतीय, वाचा टॉप १० लिस्ट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 4, 2018 08:04 PM IST

ताज्या बातम्या