मोदी सरकार येताक्षणीच लष्कराची मोठी कारवाई, 'अल कायदा'चा काश्मीरमधला म्होरक्या झाकिर मुसा ठार

मोदी सरकार येताक्षणीच लष्कराची मोठी कारवाई, 'अल कायदा'चा काश्मीरमधला म्होरक्या झाकिर मुसा ठार

देशात मोदी सरकार आल्यानंतर लगेचच लष्कराच्या एका मोठ्या कारवाईची बातमी आली आहे. कुख्यात अतिरेकी झाकीर मुसा हा पुलवामामध्ये सुरक्षा फौजांच्या जाळ्यात अडकून ठार झाला. पोलीस, लष्कर आणि निमलष्करी दलाच्या जवानांनी पुलवामामधल्या त्रालमध्ये वेढा घालून ही कारवाई केली.

  • Share this:

पुलवामा, 23 मे : देशात मोदी सरकार आल्यानंतर लगेचच लष्कराच्या एका मोठ्या कारवाईची बातमी आली आहे. कुख्यात अतिरेकी झाकीर मुसा हा पुलवामामध्ये सुरक्षा फौजांच्या जाळ्यात अडकून ठार झाला. पोलीस, लष्कर आणि निमलष्करी दलाच्या जवानांनी पुलवामामधल्या त्रालमध्ये वेढा घालून ही कारवाई केली.

तालिबान - ए- काश्मीर

बुऱ्हाण वणी मारला गेल्यानंतर झाकीर मुसा याची हिज्बुल मुजाहिद्दीनच्या काश्मीर विभागाचा म्होरक्या म्हणून नेमणूक झाली होती. पण त्यानंतर त्याने स्वतंत्रपणे तालिबान - ए- काश्मीर स्थापन केलं. तो अल कायदा चा काश्मीरमधला म्होरक्या होता.

लष्कराची मोठी मोहीम

लष्कर गेले काही दिवस झाकीर मुसाच्या मागावर होतं. त्याला शोधण्यासाठी लष्कराने एक मोठी मोहीम राबवली होती. याच मोहिमेमध्ये अल कायदाचे तीन अतिरेकीही मारले गेले.

22 वर्षांचा झाकीर मुसा

झाकीर मुसा हा 22 वर्षांचा आहे. तो सिव्हील इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे. बुऱ्हाण वणी जिथे मारला गेला गावाजवळचं नोरपोरा हे त्याचं मूळ गाव. काश्मीरमधल्या दहशतवादी कारवायांमध्ये त्याचा हात असल्याने सुरक्षा यंत्रणा त्याला जाळ्यात अडकवण्यासाठी प्रयत्न करत होत्या.

दहशतवादी हल्ला

काश्मीरमधल्या पुलवामामध्येच सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 जवानांचा मृत्यू ओढवला होता. त्यानंतर भारताने पाकिस्तानमधल्या बालाकोटमध्ये एअर स्ट्राइक केला.

=======================================================================================

VIDEO : 'राज्यात आम्ही लहान, पण 'हा' नेता उद्धव ठाकरेंचा मोठा भाऊ'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Pulwama
First Published: May 23, 2019 08:04 PM IST

ताज्या बातम्या