'अल कायदा'च्या हल्ल्यांच्या धमकीवर ही आहे भारताची प्रतिक्रिया

'अल कायदा'च्या हल्ल्यांच्या धमकीवर ही आहे भारताची प्रतिक्रिया

काश्मीमध्ये हल्ले करण्याची धमकी देणारे व्हिडीओ अल कायदाने प्रसिद्ध केल्याचा दावा जर्मनीतल्या एका मासिकाने केला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 11 जुलै : दहशतवादी संघटना अल कायदा (Al-Qaeda) चा प्रमुख आयमान अल जवाहिरी याचा भारताला धमकी देण्याचा VIDEO प्रसिद्ध झाला होता. त्यावर भारताने आज आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. परराष्ट्रमंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी त्यावर प्रतिक्रिया देताना भारतीय सुरक्षा संस्थांवर आपला विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, अशा धमक्यांना आम्ही भीत नाही. त्यांना कुणीही गांभीर्याने घेत नाही. कुठल्याही परिस्थितीशी मुकाबला करायला भारताच्या सुरक्षा संस्था तयार आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलं.

काश्मीमध्ये हल्ले करण्याची धमकी देणारे व्हिडीओ अल कायदाने प्रसिद्ध केल्याचा दावा जर्मनीतल्या एका मासिकाने केला होता. या व्हिडीओत जवाहिरी हा धमकी देत असल्याचं सांगण्यात आलंय. काश्मीरमध्ये लष्करावर सातत्याने हल्ले करा आणि भारतीय लष्कराला जेरीस आणा अशी वल्गनाही त्याने केलीय.

अल कायदाच्या या व्हिडीओची भारतीय सुरक्षा संस्थांनीही खातरजमा केल्याची माहिती  सुत्रांनी दिलीय.

हिटलरची कार होणार इतिहासजमा, काय आहे या कारची खासियत?

देशात मोदी सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर लगेचच मे महिन्यात लष्कराच्या एका मोठ्या कारवाईत झाकीर मुसा हा पुलवामामध्ये सुरक्षा फौजांच्या जाळ्यात अडकून ठार झाला. पोलीस, लष्कर आणि निमलष्करी दलाच्या जवानांनी पुलवामामधल्या त्रालमध्ये वेढा घालून ही कारवाई केली. तो स्वत:ला काश्मीरमधला अल कायदाचा कमांडर समजत होता.

तालिबान - ए- काश्मीर

बुऱ्हाण वणी मारला गेल्यानंतर झाकीर मुसा याची हिज्बुल मुजाहिद्दीनच्या काश्मीर विभागाचा म्होरक्या म्हणून नेमणूक झाली होती. पण त्यानंतर त्याने स्वतंत्रपणे तालिबान - ए- काश्मीर स्थापन केलं. तो अल कायदा चा काश्मीरमधला म्होरक्या होता.

पोलिसांनी उद्ध्वस्त केला माओवाद्यांचा ट्रेनिंग कॅम्प, शस्त्रसाठा जप्त

लष्कराची मोठी मोहीम

लष्कर गेले काही दिवस झाकीर मुसाच्या मागावर होतं. त्याला शोधण्यासाठी लष्कराने एक मोठी मोहीम राबवली होती. याच मोहिमेमध्ये अल कायदाचे तीन अतिरेकीही मारले गेले.

झाकीर मुसा हा 22 वर्षांचा आहे. तो सिव्हील इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे. बुऱ्हाण वणी जिथे मारला गेला गावाजवळचं नोरपोरा हे त्याचं मूळ गाव. काश्मीरमधल्या दहशतवादी कारवायांमध्ये त्याचा हात असल्याने सुरक्षा यंत्रणा त्याला जाळ्यात अडकवण्यासाठी प्रयत्न करत होत्या.

First published: July 11, 2019, 5:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading