"ना ना करते, प्यार तुम्हीं से कर बैठे", अखिलेश यादवांचा नितीशकुमारांना टोला

"ना ना करते, प्यार तुम्हीं से कर बैठे, करना था इंकार मगर इक़रार तुम्हीं से कर बैठे" या गाण्याचे बोल ट्विट केलेत आणि खाली 'बिहार टुडे' अशी सूचक टीप लिहिली आहे.

  • Share this:

27 जुलै : बिहारमध्ये झालेल्या सत्तांतराचे पडसाद आता देशभर उमटू लागले आहेत. काँग्रेसचे नेते शशी थरूर यांच्यापासून ते भाजपचे नेते मुख्तार अब्बास नख्वी यांच्यापर्यंत अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत पण सगळ्यात जास्त गाजते आहे ती समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश कुमार यांची प्रतिक्रिया.

अखिलेश कुमार यांनी नितीशकुमार यांच्या या राजकीय खेळीचं चांगलंच तोंडसुख घेतलं. अखिलेश यांनी एक टि्वट केलंय. या ट्विटमध्ये 1965 साली रिलीज झालेल्या 'जब जब फूल खिले' या सिनेमातल्या "ना ना करते, प्यार तुम्हीं से कर बैठे, करना था इंकार मगर इक़रार तुम्हीं से कर बैठे" या गाण्याचे बोल ट्विट केलेत आणि खाली 'बिहार टुडे' अशी सूचक टीप लिहिली आहे.

जे नितीश कुमार भाजपला इतके दिवस 'इन्कार' (नकार) देत होते त्याच भाजपशी आता इकरार (प्रेम) करून बसले आहे असं अखिलेश कुमारला सुचवायचं आहे.

तर दुसरीकडे दिग्विजय सिंह यांनीही बशीर भद्र यांचा एक शेर ट्विट करून नितीश कुमारांवर टीका केली आहे.या शेरमध्ये बशीर भद्र म्हणतात, 'उसीको हक है जिने का इस जमाने मैं जो इधर का दिखता रहे पर उधर का हो जाए'.

blockquote class="twitter-tweet" data-lang="en">

किसी ने बशीर बद्र का शेर मौक़े पर याद दिलाया है -

"उसी को हक़ है जीने का इस ज़माने में,

जो इधर का दिखता रहे और उधर का हो जाए!"

-Om Thanvi

— digvijaya singh (@digvijaya_28) July 27, 2017

तर  पुढच्या एका ट्विटमध्ये  दिग्विजय सिंहांनी दोन सरड्यांचा आलिंगनाचा फोटो पोस्ट करून त्याला बिहार गठबंधन म्हटलंय.

अशा अनेक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहेत.

First published: July 27, 2017, 4:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading