वर्ल्ड कपमधील पराभवानंतर 4 दिवस... बुमराहनं पहिल्यांदाच सांगितला 'तो' वाईट अनुभव! काय आहे पांचजन्य मासिकात बंगळुरु स्थित आयटी कंपनी इन्फोसिसच्या (Infosys) माध्यमातून वस्तू आणि सेवा कर (GST) आणि आयकर पोर्टलमधील त्रुटी संबंधित राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समर्थक पांचजन्य (Panchajanya) साप्ताहिक मासिकामध्ये शंका उपस्थित करण्यात आली. कोणतीही 'राष्ट्रविरोधी शक्ती' याद्वारे भारताचे आर्थिक हितसंबंध दुखावण्याचा प्रयत्न करत आहे का? असा सवाल या साप्ताहिक मासिकामध्ये RSSनं सवाल उपस्थित केला आहे. तसंच इन्फोसिसवर या मासिकाद्वारे नक्षलवादी, डावे यांना मदत केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र त्याचे पुरावे आमच्याकडे नाहीत, असंही पांचजन्यमध्ये म्हटलं आहे. इन्फोसिस कंपनीच्या माध्यमातून एखादी देशविरोधी शक्ती देशाच्या आर्थिक हिताविरोधात तर काम करीत नाही ना, अशी शंका या साप्ताहिकामध्ये उपस्थित करण्यात आली आहे. आधी भाची मग 21 वर्षीय आत्यासोबत घडलं विपरीत; परप्रांतीयांच्या कृत्यानं सातारा हादरलं आत्तापर्यंत RSSकडून असे आरोप किंवा टीका विशिष्ट व्यक्ती, राजकीय पक्ष किंवा त्याचे कार्यकर्ते आणि विशिष्ट संघटनेच्या काही विभागांवर करण्यात आली आहे. मात्र एखाद्या कॉर्पोरेट कंपनीवर एवढा मोठा आरोप करण्यात आल्याची ही पहिलीच घटना आहे. ताज्या आवृत्तीत, 'पांचजन्य' ने इन्फोसिसची 'साख और अघात नावाची चार पानांची कव्हर स्टोरी प्रकाशित केली आहे आणि कव्हर पेजवर त्याचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे फोटो आहे. उँची उडान, फिका पकवान, अशी टीकाही या लेखात करण्यात आली आहे.भारतीय कंपनी के नाते इंफोसिस का भारत की उन्नति में महत्वपूर्ण योगदान है।इंफोसिस संचालित पोर्टल को लेकर कुछ मुद्दे हो सकते हैं परंतु पान्चजन्य में इस संदर्भ में प्रकाशित लेख,लेखक के अपने व्यक्तिगत विचार हैं,तथा पांचजन्य संघ का मुखपत्र नहीं है।@editorvskbharat
— Sunil Ambekar (@SunilAmbekarM) September 5, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: RSS