S M L

डिसेंबरमध्ये आकाश अंबानींचे शुभमंगल

अंबानी परिवारात होणाऱ्या या शुभकार्यापूर्वी रिलायन्सचे अध्यक्ष श्री मुकेश आणि श्रीमती नीता अंबानी यांनी सिद्धिविनायकाचे दर्शन आणि आशीर्वाद घेतले

Chittatosh Khandekar | Updated On: Mar 26, 2018 12:10 AM IST

डिसेंबरमध्ये आकाश अंबानींचे शुभमंगल

25 मार्च: उद्योगपती मुकेश अंबानी यांचे थोरले  चिरंजीव  आकाश अंबानी यांचं शुभमंगल यावर्षी डिसेंबर महिन्यात होणार आहे. त्याआधी त्यांचाय साखरपुडा  जून महिन्यात होईल.

अंबानी  परिवारात होणाऱ्या या  शुभकार्यापूर्वी रिलायन्सचे  अध्यक्ष श्री मुकेश आणि  श्रीमती नीता अंबानी यांनी सिद्धिविनायकाचे दर्शन  आणि आशीर्वाद घेतले.  सिद्धिविनायकाचे आशीर्वाद घेण्यासाठी, होणाऱ्या सुनेसह परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते. आकाश अंबानी यांंचं लग्न हिऱ्यांचे व्यापारी असलेल्या  रसेल मेहता यांची कन्या  श्र्लोका मेहता हिच्याशी होणार आहे. आकाश आणि श्र्लोका दोघंही एकाच शाळेत शिकले आहेत. त्यांचं लग्न मुंबईतच संपन्न होईल. हे लग्न चार ते पाच दिवस चालेल  अशी सर्वत्र चर्चा आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 26, 2018 12:10 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close