Home /News /national /

'अमेरिकेच्या बाँबने जपान हादरलं आणि आमच्या बाँबने मोदी हादरले' : 'अकाली'चा VIDEO VIRAL

'अमेरिकेच्या बाँबने जपान हादरलं आणि आमच्या बाँबने मोदी हादरले' : 'अकाली'चा VIDEO VIRAL

Farm bill : दुसऱ्या महायुद्धात जपानच्या एका बाँबने अमेरिका हादरली तसं आमच्या बाँबने मोदी हादरले आहेत, असं सांगणारा अकाली दलाच्या सुखबीरसिंग बादल यांचा एक VIDEO सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

    चंदिगड, 25 सप्टेंबर : कृषी विधेयकांना विरोध करताना मोदी सरकारचा भाग असणाऱ्या अकाली दलाने टोकाची भूमिका घेतली आहे. दुसऱ्या महायुद्धात जपानच्या एका बाँबने अमेरिका हादरली तसं आमच्या बाँबने मोदी हादरले आहेत, असं सांगणारा अकाली दलाच्या सुखबीरसिंग बादल यांचा एक VIDEO सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पंजाबमध्ये मुक्तसर इथे एका कार्यक्रमात सुखबीरसिंग बादल यांनी मोदींना कसा धक्का बसला हे भाषणात सांगितलं. 'दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेच्या अणुबाँबने जसं जपानला हादरवलं, तसा जबरदस्त धक्का आम्ही मोदींना दिला आहे.' केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी राजीनामा दिल्यानंतर मोदी सरकारला धक्का बसल्याचा उल्लेख त्यांनी केला. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या हमीभावाची (MSP) सुरक्षा नवीन विधेयकांमुळे संपुष्टात येणार आहे, असं सांगत अकाली दलाने या विधेयकांना विरोध केला आहे. अकाली दलाचा का आहे विरोध पंजाबमध्ये अकाली दल हा भाजपाचा मित्रपक्ष आहे. भाजपची पकड ही शहरी भागावर जास्त आहे. तर अकाली दलाची मुळं ग्रामीण भागात असल्यामुळं अकाली दल शेतकऱ्यांच्या बाजूने उभा आहे. अकाली दलाची मोठ्या प्रमाणात वोट बँक ग्रामीण असल्यामुळे या पक्षाने शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहण्याचा निर्णय घेतला. या ग्रामीण वोटबँकेच्या बळावर अकाली दलाने 2007 आणि 2012 या दोन सलग टर्ममध्ये सत्ता मिळवली होती. म्हणूनच हा पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहात मोदींना विरोध करत आहे, असं मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलं आहे. या बिलाचा फटका हमीभावाला बसणार का? कृषीउत्पन्न बाजार आणि व्यापार (उत्तेजन आणि सुविधा) कायदा प्रामुख्याने कृषी उद्योग खुला करण्याच्या उद्देशाने करण्यात आला आहे. शेतकऱ्याला ठकाविक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेरची खुलेपणाने त्याचा माल विकायला परवानगी आहे. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात सहजपणे शेतकऱ्याला खुल्या बाजारात माल विकता येईल, अशी सोय या नव्या कायद्यात आहे. त्यामुळे राज्याचं बंधन राहणार नाही आणि इ कॉमर्सद्वारेही शेतकरी माल विकू शकेल. पण या कायद्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचं अस्तित्व आणि अधिकार मर्यादित होत असल्याने शेतकऱ्यांना हमीभावाचा (MSP) हक्कही मिळणार नाही, अशी भीती विरोधक व्यक्त करत आहेत. बाजार समित्यादेखील संकटात येणार असून राज्य सरकार शेतकऱ्यांकडून समितीच्या बाहेर व्यवहार केल्यास मार्केट फी, सेस आणि लेव्ही घेऊ शकणार नाही.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Shiromani Akali Dal

    पुढील बातम्या