मुंबई, 27 डिसेंबर : चंद्राला (Moon) प्रेमात (Love) आणि विज्ञानामध्ये (Science) मोठं स्थान आहे. पुस्तकात वाचून किंवा सिनेमातले फंडे पाहून अनेक प्रियजन आपल्या आवडत्या व्यक्तीच्या झोळीत चंद्र आणून देण्याच्या गोष्टी करत असतात. तर, पृथ्वीच्या बाहेर मनुष्यानं सर्वात प्रथम चंद्रावर पाय ठेवले. त्यानंतर प्रत्येक वैज्ञानिकाची चंद्रावर जाण्याची आणि तेथील परिस्थितीचा अभ्यास करण्याची इच्छा असते.
राजस्थानमधल्या (Rajasthan) एका व्यक्तीनं जे केलं आहे ते ऐकून तुम्ही थक्क झाल्याशिवाय राहणार नाही. अजमेरमध्ये राहणाऱ्या या व्यक्तीनं त्याच्या लग्नाच्या वाढदिवशी (Marriage Anniversary) थेट चंद्रावरील जमिनीचा एक तुकडा त्यांची पत्नी सपना यांना भेट दिला आहे. बायकोला थेट चंद्रावर संपत्ती घेऊन देणाऱ्या या नवऱ्याची संपूर्ण राजस्थानमध्ये चर्चा होत आहे.
धर्मेंद्र अनिजा असं या व्यक्तीचं नाव आहे. “लग्नाच्या आठव्या वाढदिवसानिमित्त बायकोला काही तरी खास गिफ्ट देण्याचा माझा विचार होता, त्यावेळी ‘मिशन मून’ची (Mission Moon) कल्पना सुचली,’’ असं धर्मेंद्र यांनी सांगितले.
Ajmer man gifts plot of land on Moon to wife on wedding anniversary
Read @ANI Story | https://t.co/6jXrhngCUQ pic.twitter.com/5u7iqIky7d
— ANI Digital (@ani_digital) December 26, 2020
कशी केली चंद्रावर खरेदी?
धर्मेंद्र यांच्या लग्नाचा 24 डिसेंबर रोजी वाढदिवस होता. यानिमित्तानं कार, दागिने, घरातील वस्तू यासारख्या गोष्टींची खरेदी अनेक जण करतात, मात्र त्यांना काही तरी वेगळं करण्याची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी चंद्रावर जमीन खरेदी करुन बायकोला गिफ्ट दिली. 'चंद्रावरच्या जमिनीची मालकी असलेला पहिला मी भारतीय आहे', असा धर्मेंद्र यांचा दावा आहे.
धर्मेंद्र यांनी अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातल्या ‘लूना सोसायटी इंटरनॅशनल’ च्या माध्यमातून ही खरेदी केली. या सर्व प्रक्रियेस त्यांना जवळपास एक वर्ष लागले. धर्मेंद्रच्या पत्नी सपना यांना लग्नाच्या वाढदिवशी ‘जगाच्या बाहेर’ असलेलं हटके गिफ्ट मिळण्याची कोणतीही अपेक्षा नव्हती. ‘सर्वस्वी अनपेक्षित गिफ्ट दिल्याचा खूप आनंद झाला’, असे अशी भावना सपना यांनी व्यक्त केली.