Article 370 : VIDEO : मोदी सरकारचे 'जेम्स बाँड' ग्राउंड झीरोवर, काश्मिरी जनतेशी साधला संवाद

Article 370 : VIDEO : मोदी सरकारचे 'जेम्स बाँड' ग्राउंड झीरोवर, काश्मिरी जनतेशी साधला संवाद

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा काश्मीरमधला एक व्हिडिओ ANI या वृत्तसंस्थेने ट्वीट केला आहे, यामध्ये अजित डोवाल काश्मिरी लोकांसोबत जेवण घेत त्यांच्याशी संवाद साधतायत.

  • Share this:

श्रीनगर, 7 ऑगस्ट : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी काश्मीरमध्ये जाऊन तिथल्या सुरक्षेचा आढावा घेतला. मोदी सरकारचे जेम्स बाँड अशी ओळख असलेले अजित डोवाल हे प्रत्यक्ष 'ग्राउंड झीरो' वर जाऊन तिथल्या परिस्थितीचा आढावा घेत आहेत.अजित डोवाल हे काश्मीरच्या जनतेशी थेट संवाद साधत आहेत. सरकारच्या या निर्णयाला काश्मिरी जनतेचाही पाठिंबा आहे, असं या संवादातून माझ्या लक्षात आलं, असं अजित डोवाल म्हणाले.अजित डोवाल यांचा काश्मीरमधला एक व्हिडिओ ANI या वृत्तसंस्थेने ट्वीट केला आहे.

या व्हिडिओमध्ये अजित डोवाल हे काश्मीरमधल्या स्थानिकांना सरकारच्या निर्णयाची माहिती देत आहेत. रोजरोजच्या बंदने काय साध्य होणार, असा प्रश्न त्यांनी विचारला तेव्हा काश्मीरवासियांनाही त्यांचं म्हणणं पटलं. काश्मीरची प्रगती हवी असेल तर या निर्णयाचं स्वागतच करायला हवं, हेही त्यांनी स्थानिकांना सांगितलं. अजित डोवाल यांनी तिथल्या लोकांसोबत जेवणही घेतलं. तुमच्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी हा निर्णय म्हणजे एक चांगली संधी आहे, असंही डोवाल यांनी त्यांना सांगितलं.

VIDEO : कलम 370 हटवल्यानंतर काश्मीरमध्ये ही आहे स्थिती

काश्मीरमधलं कलम 370 रद्द करण्याचा निर्णय घेण्याआधी मोदी सरकारने काश्मीरमध्ये सुरक्षेचा कडक बंदोबस्त केला होता. त्यामुळेच हा निर्णय जाहीर होऊनही काश्मीरमध्ये एकही घातपाताची घटना घडलेली नाही, काश्मीर शांत आहे याचं श्रेय अजित डोवाल यांच्या रणनीतीलाही जातं. ANI या वृत्तसंस्थेने काश्मीरचा आणखीही एक व्हिडिओ ट्वीट केला आहे. यामध्ये काश्मीरमधलं जनजीवन हळूहळू पूर्ववत होताना दिसतं आहे.

=======================================================================================

ड्रोनच्या नजरेतून साताऱ्यातील पुराचे भयावह दृश्य, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 7, 2019 06:35 PM IST

ताज्या बातम्या