राजस्थानमधील राजकीय वादळ शांत होत असताना काँग्रेसमध्ये मोठा बदल

राजस्थानमधील राजकीय वादळ शांत होत असताना काँग्रेसमध्ये मोठा बदल

राजस्थान सरकारवरील संकट केवळ टळलं असल्याचा इशारा भाजपने दिला आहे

  • Share this:

जयपुर, 16 ऑगस्ट : राजस्थानचं (Rajasthan) का राजकीय संकट (Political Crisis) थांबलं असलं तरी अद्यापही काँग्रेसमध्ये मोठा बदल होत आहे. हाती आलेल्या माहितीनुसार काँग्रेसने राजस्थान काँग्रेसचे प्रदेश प्रभारी पदावरुन अविनाश पांडे (Avinash Pandey) यांची पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता अजय माकन  (Ajay Maken) राजस्थान काँग्रेसचे नवीन प्रभारी असतील. काँग्रेसचे संगटन महासचिव केसी वेणुगोपाल (KC Venugopal) यांनी हा आदेश जारी केला आहे.

राजस्थान सरकारवर संकटाची छाया संपल्याचे सांगितले जात आहे. मात्र संकट केवळ टळलं आहे, असा दावा भाजपकडून केला जात आहे. काँग्रेस पार्टीच्या अनेक प्रभारींनी घरवापसी केली आहे. संकट दूर करण्याचा क्रमात मोठा निर्णय घेत काँग्रेस पार्टीचे आमदार भंवर लाल शर्मा (Bhanwar Lal Sharma) आणि विश्वेंद्र सिंह (Vishvendra Singh) यांच्या निलंबनाला रद्द करण्यात आलं आहे. या दोन्ही आमगारांवर अशोक गेहलोत यांच्या नेतृ्त्वात असलेल्या राजस्थान सरकार पाडण्याच्या कारस्थानात सामील असण्याचा आरोप लावला होता. यानंतर पायलटच्या गटातील या दोन्ही आमदारांना पार्टीच्या प्राथमिक सदस्यत्वामधून निलंबित करण्यात आलं होतं.

यापूर्वी सचिन पायलट यांनी दिल्लीत काँग्रेसचे नेत्यांची भेट घेत राजस्थानातील राजकीय संकटाचं कारण सांगितलं होतं आणि त्यांना तेथे दिलासा देण्यात आला होता की त्यांनी सांगितलेल्या मुद्द्यांवर लवकरच एका कमिटीचं गठण करण्याचा विचार केला जाईल. आपलं वचन पूर्ण करीत काँग्रेसच्या वरिष्ठांच्या निर्देशानुसार तीन सदस्यांच्या कमिटीचं गठण करण्यात आलं आहे. ज्यामध्ये काँग्रेसचे वरिष्ठ नेता अहमद पटेल (Ahmed Patel), संगटन महासचिव केसी वेणुगोपाल आणि राजस्थान काँग्रेसचे प्रदेश प्रभारी अजय माकन असतील.

Published by: Meenal Gangurde
First published: August 16, 2020, 10:59 PM IST

ताज्या बातम्या