भिकारिणीची शेवटची इच्छा पूर्ण, शहिदांच्या कुटुंबाला दिले 6.5 लाख रुपये

लोकांकडे एक रुपया, दोन रुपयाची भीक मागून जगणारी एक भिकारीण. आपल्या मृत्यूआधी तिनं असं काही काम केलं की तिचा आदर्श भलेभले गिरवू शकतात.

News18 Lokmat | Updated On: Feb 21, 2019 03:41 PM IST

भिकारिणीची शेवटची इच्छा पूर्ण, शहिदांच्या कुटुंबाला दिले 6.5 लाख रुपये

जयपूर, 21 फेब्रुवारी : लोकांकडे एक रुपया, दोन रुपयाची भीक मागून जगणारी एक भिकारीण. आपल्या मृत्यूआधी तिनं असं काही काम केलं की तिचा आदर्श भलेभले गिरवू शकतात.

पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्यानंतर अनेकांनी मदतीचे हात पुढे केले. त्यात अमिताभ बच्चन, सलमान खानपासून मोठमोठे उद्योगपतीही आहेत. पण आता त्यात राजस्थानच्या या भिकारिणीचं नावही पुढे आलंय. तिची शेवटची इच्छा म्हणून तिचे 6 लाख 61 हजार 600 रुपये शहिदांना दिले गेले.

सहा महिन्यांपूर्वी झालेला मृत्यू

या महिलेचं नाव होतं देविका शर्मा. सहा महिन्यांपूर्वी तिचा मृत्यू झाला. अजमेरच्या बजरंग गढजवळच्या माता मंदिराबाहेर ती भीक मागायची. अनेक वर्ष भीक मागून तिनं पै पै जोडले होते. रोज भिकेत मिळालेले पैसे ती मंदिर कमिटीच्या सदस्यांना द्यायची. त्यांनी या वृद्ध महिलेचं बँक अकाऊंट उघडलं होतं. तिचे पैसे त्यात जमा व्हायचे.  या महिलेनं मृत्यूपूर्वी सांगितलं होतं की या पैशांचा उपयोग चांगल्या कामासाठी व्हावा.

जिल्हाधिकाऱ्यांना दिले पैसे

Loading...

मंदिर कमिटीचे सचिव संजीव भार्गव यांनी सांगितलं, देविका शर्मा यांच्या इच्छेनुसार मंदिर कमिटी हे पैसे एखाद्या चांगल्या कामासाठी देणार होती. पण पुलवामा इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर शहिदांच्या कुटुंबाला मदत करणं हे मोठं पुण्याचं काम आहे.

मंदिर कमिटीच्या सदस्यांनी ही रक्कम मुख्यमंत्री मदत निधीमध्ये जमा केलेत. या रुपयांचा ड्राफ्ट करून जिल्हाधिकाऱ्याकडे सोपवलाय.

पुलवामा येथील अवंतीपोरा येथील गोरीपोरा सीआरपीएफच्या ताफ्यावर IEDद्वारे हल्ला केला. हल्लाजैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.


यवतमाळमध्ये काश्मिरी विद्यार्थ्यांना युवा सेनेकडून मारहाण, VIDEO सोशल मीडियावर व्हायरल


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 21, 2019 03:01 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...