Home /News /national /

मुलगी म्हणाली, या मुलाशीच लग्न करणार, तरुणाची पोलीस ठाण्यात धाव, म्हणाला, 'साहेब मला वाचवा...'

मुलगी म्हणाली, या मुलाशीच लग्न करणार, तरुणाची पोलीस ठाण्यात धाव, म्हणाला, 'साहेब मला वाचवा...'

Shocking Love Story: मध्य प्रदेशातील चंबळमधून एकतर्फी प्रेमाचे विचित्र प्रकरण समोर आले आहे. 22 वर्षांची मुलगी 12 पास मुलाच्या प्रेमात पडली (Unique love story). त्यानंतर मुलीने त्या मुलाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्याने मुलीला प्रपोज केले, पण तिने नकार दिला. एवढंच नाही तर भरलेल्या पंचायतीत सर्वांसमोर तरुणीने 'मी लग्न करेन' असं सांगितलं. आता त्रस्त मुलाने पोलिसांकडे मदतीचं आवाहन केलं आहे.

पुढे वाचा ...
  ग्वाल्हेर / मुरैना, 12 मे : चंबळमध्ये एकतर्फी प्रेमात पडलेल्या तरुणीने खाणंपिणं सोडलं आहे. मुलीनं एका मुलाला प्रपोज केलं. पण मुलाने तिचं प्रेम नाकारलं. आता 'मी या मुलाशीच लग्न करणार' असा हट्ट त्या मुलीने धरला आहे. मुलीच्या हट्टाला कंटाळून त्या मुलाने अखेर पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली आणि पोलिसांना म्हणाला, 'साहेब, मला या मुलीपासून वाचवा.' मुरैना जिल्ह्यातील सबलगडच्या टोंगा गावात एकतर्फी प्रेमाचं विचित्र प्रकरण समोर आलं आहे. 22 वर्षीय बीए पास तरुणी शेजारच्या गावातील 12वी पास नवलेश कुशवाहच्या प्रेमात पडली. मुलीने नवलेशसमोर अनेकवेळा प्रेम व्यक्त केलं. पण नवलेश प्रत्येक वेळी 'नाही' म्हणाला. शेवटी एकतर्फी प्रेमात असलेल्या मुलीने खाणंपिणं बंद केलं. घरच्यांनी या मुलीला विचारलं असता तिने नवलेशशीच लग्न करणार असल्याचं सांगितलं. मुलीचे कुटुंबीय नवलेशच्या घरी पोहोचले आणि त्यांनी त्यांच्या मुलीचं आणि नवलेशचं लग्न लावून देण्याची विनंती केली. पण नवलेशच्या कुटुंबीयांनीही साफ नकार दिला. हे वाचा - Video:बापरे! वरात आहे की त्सुनामी; जेवणाऱ्या काऊंटरच्या दिशेने धावत सुटले पाहुणे नवलेशच्या कुटुंबात मुलीच्या चुलत बहिणीचे लग्न झालं आहे. त्यामुळे मुलीचं काही कार्यक्रमांमध्ये त्यांच्याकडे येणं-जाणं होत असे. त्यादरम्यान ती नवलेशच्या प्रेमात पडली आणि त्यानंतर तिने त्याच्याशीच लग्न करण्याचं ठरवलं. नवलेशच्या घरच्यांना हे पटलं नाही. तेव्हा मुलीच्या कुटुंबीयांनी गावातील लोकांची पंचायत बोलावली. भरलेल्या पंचायतीतही तरुणीने प्रेम व्यक्त करत नवलेशशीच लग्न करणार असल्याचं सांगितलं. पंचायतीत सर्वांच्या उपस्थितीत नवलेशने स्पष्ट नकार दिला. शेवटी मुलीने आत्महत्या करण्याची धमकीही दिली. हे वाचा - जिवंतपणी नरकयातना! कोरोना रुग्णासोबत भयंकर कृत्य; संतापजनक VIDEO समोर
   तरुणीच्या हट्टामुळे त्रस्त तरुणांनं पोलीस ठाणं गाठलं
  मुलीचं एकतर्फी प्रेम आणि जबरदस्त हट्टीपणाला कंटाळून नवलेशनं सबलगड पोलीस ठाणं गाठलं. नवलेशने पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला असून, त्यात त्यानं जबरदस्तीने लग्न करण्याचा मुलीचा आग्रह असल्याचं नमूद केला आहे. यासोबतच कुटुंबीयांवर दबाव आणल्याची तक्रार त्यांनी केली आहे. नवलेशने साबलगड पोलीस ठाण्यात वर्षापूर्वी अर्ज केला होता. मात्र, पोलिसांनी त्याची मदत केली नाही. यानंतर मुलीचा भाऊ आणि वडील त्याच्या घरी आले आणि त्याला मारहाणही केली.
  Published by:Digital Desk
  First published:

  Tags: Love story, Madhya pradesh

  पुढील बातम्या