मराठी बातम्या /बातम्या /देश /

Watch Video: जालौरच्या हायवेवर सुखोई- जग्वारचं लँडिंग; राजनाथ सिंह, नितीन गडकरींची उपस्थिती

Watch Video: जालौरच्या हायवेवर सुखोई- जग्वारचं लँडिंग; राजनाथ सिंह, नितीन गडकरींची उपस्थिती

आज राजस्थानच्या जालौरमधील बाडमेर (Barmer in Rajasthan)  हायवेवर स्पेशल एअरस्ट्रिपची सुरुवात करण्यात आली.

  • Published by:  Pooja Vichare

राजस्थान, 09 सप्टेंबर: आज राजस्थानच्या जालौरमधील बाडमेर (Barmer in Rajasthan) हायवेवर स्पेशल एअरस्ट्रिपची सुरुवात करण्यात आली. आज या आपत्कालीन फील्ड (Emergency Landing Field) लँडिंगचं आज उद्घाटन झालं. पहिल्यांदा सुखोई SU-30 MKI लढाऊ विमान राष्ट्रीय महामार्गावर उतरलं. सुखोई आणि जग्वार सारख्या हवाई दलाची लढाऊ विमानांनी पहिल्यांदा या हायवेवर लॅंडिंग केलं.

या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, (Rajnath Singh) रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) , एअर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया आणि चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत उपस्थित होते.

विमान लॅंड होताच उपस्थित लोकांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत केलं.

या कार्यक्रमा दरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, हे एअरस्ट्रिप पाकिस्तान सीमेपासून काही अंतरावर आहे. त्यामुळे हे सिद्ध होतं की भारत देश कोणत्याही आव्हानासाठी नेहमीच तयार असतो. तीन किमी हा लांब पट्टा 19 महिन्यांत तयार करण्यात आला आहे. कोरोनाच्या काळातही तो तयार केला गेला आहे.

तसंच या एअरस्ट्रिपसह तीन हेलिपॅड देखील तयार करण्यात आलेत. अशा परिस्थितीत त्यांचा केवळ युद्धातच नव्हे तर नैसर्गिक आपत्ती किंवा इतर कोणत्याही आपत्तीच्या वेळीही खूप उपयोग होईल, असंही संरक्षण मंत्र्यांनी सांगितलं आहे.

First published:

Tags: Nitin gadkari, Rajnath singh