नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय सैन्यदलाला घाबरून पाकिस्ताननं विंग कमांडर अभिनंदन यांची सुटका केल्याचा मोठा धक्कादायक खुलासा आता पाकिस्तानकडून करण्यात आला आहे. पाकिस्तानच्या बालाकोट परिसरात 26 फेब्रुवारी 2019 रोजी जो एअरस्ट्राइक करण्यात आला होता त्यावर आतापर्यंत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. मात्र या एअरस्ट्राइकनंतर पाकिस्तानी सैन्यदल आणि सरकार यांनी मोठा धसका घेतल्याचं एक विधान समोर आलं आहे.
एअरस्ट्राईक नंतर भारत मोदी सरकारबद्दल पाकिस्तानमध्ये एकप्रकारची भीती निर्माण झाली होती. पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री ख्वाजा मोहम्मद असिफ यांनी याची कबुली दिल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. पाकिस्तान विधानसभेचे माजी सभापती अयाज सादिक म्हणाले, 'पाकिस्तान लष्कर प्रमुख कमर जावेद बाजवा यांचे पाय थरथर कापत होते आणि भारताकडून आक्रमण होण्याच्या भीतीनं डोक्यावर घाम फुटला होता. बाजवा यांना भारताकडून हल्ला होईल याची भीती वाटत होती. या भीतीपोटी विंग कमांडर अभिनंदन यांना पाकिस्ताननं सोडलं.'
राहुल जी,
आप Surgical Strike औरAir Strike पर सवाल उठा रहे थे ना?
ज़रा देखिए मोदी जी का क्या ख़ौफ़ है पाकिस्तान में
सरदार अयाज़ सादिक़ बोल रहे है पाकिस्तान के National Assembly में की Pak के Cheif of Army Staff के पैर काँप रहे थे और चेहरे पर पसीना था,कहीं भारत अटैक न कर दे!
पाकिस्तानी खासदार अयाज सादिक यांनी संसदेत दावा केला की, 'मेहमूद शाह कुरेशी यांच्यासोबतच्या बैठकीसाठी येण्यास इम्रान खान यांनी नकार दिला होता. त्यावेळी कुरेशी यांचे पाय थरथर कापत होते. डोक्यावरून घामाच्या धारा वाहात होत्या. पाकिस्ताननं बंदी बनवलेल्या विंग कमांडर अभिनंदन यांची सुटका करू अन्यथा भारत पाकिस्तानवर रात्री उशिरा हल्ला करेल.
पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री ख्वाजा मोहम्मद असिफ यांनी पाकिस्तानच्या संसदेत एक मोठा खुलासा केला असून ते म्हणाले की, भारताच्या भीतीपोटी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना सोडले. असिफ म्हणाले की, भारत सरकारबद्दल पाकिस्तान सरकारमध्ये हल्ल्याची भीती होती आणि त्यामुळे अभिनंदन यांना भारताकडे पुन्हा सोपवण्यात आलं.