वायुदलाचं AN -32 विमान बेपत्ता; वैमानिकानं उड्डाण केलं तेव्हा पत्नीच होती एअर ट्रॅफिक कंट्रोलमध्ये

वायुदलाचं AN -32 विमान बेपत्ता; वैमानिकानं उड्डाण केलं तेव्हा पत्नीच होती एअर ट्रॅफिक कंट्रोलमध्ये

आशिष यांच्या विमानाने अरुणाचल प्रदेशच्या दिशेने उड्डाण केलं त्यावेळी त्यांची पत्नी संध्या जोरहाटमध्ये ड्युटी करत होत्या. आशिष यांनी संध्या यांच्यासोबत 18 मे ला सुटी घालवली आणि ते कामावर रुजू झाले. संध्या यांच्याकडे आता त्यांच्या पतीच्या याच आठवणी उरल्या आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 4 जून : भारतीय हवाई दलाच्या एएन - 32 या बेपत्ता विमानाबदद्ल अजून काही कळू शकलेलं नाही. एएन - 32 या विमानाने आसाममधल्या जोरहाटमधून अरुणाचल प्रदेशच्या दिशेने झेप घेतली पण हे विमान मध्येच बेपत्ता झालं. या विमानाचा युद्ध पातळीवर शोध घेतला जात आहे पण याबद्दलची कोणतीही माहिती हाती लागलेली नाही.

पतीने उड्डाण केलं तेव्हा...

ज्यावेळी हे विमान बेपत्ता झालं ते विमान पायलट आशिष तन्वर चालवत होते. आशिष हरियाणामधल्या पलवलचे आहेत. त्यांची पत्नी संध्या याही हवाऊ दलाच्या एअर ट्रॅफिक कंट्रोल विभागात काम करतात.

ज्यावेळी आशिष यांच्या विमानाने अरुणाचल प्रदेशच्या दिशेने उड्डाण केलं त्यावेळी त्यांची पत्नी संध्या जोरहाटमध्ये ड्युटी करत होत्या. आशिष यांनी संध्या यांच्यासोबत 18 मे ला सुटी घालवली आणि ते कामावर रुजू झाले. संध्या यांच्याकडे आता त्यांच्या पतीच्या याच आठवणी उरल्या आहेत.

विमानाचा संपर्क तुटला...

आशिष यांच्या विमानाचा एअर ट्रॅफिक कंट्रोल रूमशी संपर्क तुटला त्यावेळी संध्या यांच्या मनाची स्थिती काय झाली असेल याची कल्पनाच हेलावून टाकणारी आहे.

आशिष तन्वर यांचं विमान गायब झाल्यानंतर त्यांच्या घरी लोकांची रीघ लागली आहे. दुसरीकडे विमानाचा शोध सुरूच आहे. उपग्रहांच्या मदतीने या विमानाचा शोध घेतला जात आहे.

गिर्यारोहकांचे मृतदेह मिळाले

या शोधमोहिमेमध्ये हिमालयाच्या रांगांमध्ये 5 गिर्यारोहकांचे मृतदेह सापडले. आठवड्याभरापूर्वीच नंदा देवी शिखराच्या जवळ 8 गिर्यारोहकांचं एक पथक बेपत्ता झालं होतं. यापैकी 5 गिर्यारोहकांचे मृतदेह मिळाले. पण हवाई दलाच्या विमानाचा शोध मात्र लागू शकला नाही.

====================================================================================================

VIDEO : युतीत जागावाटपाच्या वादावर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

First published: June 4, 2019, 9:27 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading