Home /News /national /

विमान प्रवास महागणार, आभाळाला टेकलेल्या तिकीटांच्या दरात होणार प्रत्येक महिन्यात वाढ

विमान प्रवास महागणार, आभाळाला टेकलेल्या तिकीटांच्या दरात होणार प्रत्येक महिन्यात वाढ

वाढत्या महागाईचा चटका सहन करत असलेल्या सर्वांसाठी आणखी एक त्रासदायक बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून आभाळाला भिडलेल्या विमान तिकिटांच्या दरात (Airfare) आणखी वाढ होणार आहे.

    मुंबई, 18 जून : वाढत्या महागाईचा चटका सहन करत असलेल्या सर्वांसाठी आणखी एक त्रासदायक बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून आभाळाला भिडलेल्या विमान तिकिटांच्या दरात (Airfare) आणखी वाढ होणार आहे. देशांतर्गत एअरलाईन्सच्या अधिकाऱ्यानं याचे संकेत दिले आहेत. एअर लाईन्स अधिकाऱ्यानं 'मनी कंट्रोल'ला दिलेल्या माहितीनुसार एविएशन टर्बाइन फ्यूलच्या (ATF) किंमतीमध्ये अशीच वाढ होत राहिली तर तिकीटांच्या दरामध्ये प्रत्येक महिन्यात 2 ते 4 टक्के वाढ करावी लागेल. आम्ही एकाच वेळी तिकीटाचे दर वाढवू शकत नाही, पण जेट फ्यूलचे दर असेच वाढत राहिले तर प्रत्येक महिन्यांत तिकीटांच्या दरात 300 ते 600 रूपये वाढ होईल. स्वस्त विमान सेवा उपलब्ध करणारी कंपनी गोफर्स्टच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की, 'देशांतर्गत विमान प्रवासाचे तिकीट गेल्या वर्षीपेक्षा 30 टक्के वाढले आहे. आमच्या विमान नियमानात फक्त इंधनाचा वाटा 40 टक्के असतो. त्यामुळे इच्छा नसूनही एटीएफची किंमत वाढल्यानंतर तिकीटांचा दरही वाढवावा लागतो. कोरोनानंतर दुप्पट दर जेट फ्यूलवर सर्वात जास्त टॅक्स वसूल होणाऱ्या देशांमध्ये भारताचा समावेश आहे. तिकीट दरामध्ये अचानक मोठ्या प्रमाणात वाढ झाला तर त्याचा परिणाम या व्यवसायाावर होईल. कोरोना महामारीच्या काळात याला मोठा फटका बसला आहे. इतकंच नाही तर कोरोना महामारीनंतर पूर्वीपेक्षा तिकीटांच्या दरात दुप्पच वाढ करण्यात आली आहे. दिल्ली मुंबई मार्गावरील सध्याचा सरासरी दर 4 700 ते 5,500 इतका आहे. जून 2019 मध्ये या मार्गावरील एकावेळेसचे तिकीट 2300 ते 2500 इतके होते. तर जून 2021 मध्ये 3500 ते 3800 होते. मोमोज खाल्ल्यानं झाला एकाचा मृत्यू, तुम्हीही खाण्यापूर्वी घ्या खबरदारी तिकीटांच्या वाढत्या दराचा परिणाम व्यवसायावरही होत असल्याचं एअरलाईन्सच्या अधिकाऱ्यानं सांगितलं आहे. त्यामुळे प्रवाशांच्या संख्येत सातत्यानं घट होत आहे. एप्रिल महिन्यात रोज सरासरी 4 लाख जण हवाई प्रवास करत होते. जून महिन्यात ही संख्या 3.5 लाख झाली आहे. गेल्या दोन महिन्यात विमान तिकीटाच्या दरात 30 ते 40 टक्के वाढ झाल्याची माहिती ऑनलाईन ट्रॅव्हल एजन्स यात्रा डॉट कॉमनं दिली आहे.
    Published by:Onkar Danke
    First published:

    Tags: Airplane, Inflation, Travel

    पुढील बातम्या