राजस्थानमध्ये हवाई दलाचं मिग 27 विमान कोसळलं, पायलट सुरक्षित

राजस्थानमध्ये हवाई दलाचं मिग 27 विमान कोसळलं, पायलट सुरक्षित

राजस्थानमध्ये भारतीय हवाई दलाचं विमान कोसळलं

  • Share this:

जोधपूर, 31 मार्च : राजस्थानातील जोधपूरमध्ये भारतीय हवाई दलाचे मिग 27 हे विमान कोसळले. मिग 27 लढाऊ विमान नियमित मोहिमेवर होते. जोधपूर येथील एअरबेसवरून विमानाने उड्डाण केलं होतं. या विमानातील पायलट सुरक्षित आहे. त्याने प्रसंगावधान राखत विमानातून पॅराशूटच्या सहाय्याने उडी मारली.

याबाबत हवाई दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लढाऊ विमान दुपारी 12.30 च्या सुमारास कोसळले. राजस्थानातील सिरोही जिल्ह्यातील सीवगंज जवळ ही घटना घडली. विमान कोसळण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही.

याआधी बिकानेर येथील शोभासर इथं भारतीय हवाई दलाचं मिग-21 हे लढाऊ विमान कोसळलं होतं. बिकानेर येथील नाल विमानतळाजवळ लढाऊ विमान कोसळलं होतं. त्यावेळी एक मोठा आवाज आला आणि धुर आल्याचं नागरिकांकडून सांगण्यात आलं होतं.

VIDEO: 'आपला पंतप्रधान कोण?' उद्धव ठाकरे म्हणाले...

First published: March 31, 2019, 12:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading