महाराष्ट्राच्या तरुणाचं स्वप्न पूर्ण होणार, पंतप्रधान मोदी देणार पहिल्या 'स्वदेशी' विमानाला 'बुस्टर'!

डिसेंबर मध्ये विमानाच्या चाचण्या असून त्या परिक्षेत ते विमान पास झालं तर यादव यांचं स्वप्न आणि देशाचं पहिलं स्वदेशी विमान टेक ऑफ घेणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 20, 2019 08:37 PM IST

महाराष्ट्राच्या तरुणाचं स्वप्न पूर्ण होणार, पंतप्रधान मोदी देणार पहिल्या 'स्वदेशी' विमानाला 'बुस्टर'!

मुंबई 21 ऑक्टोंबर :स्वदेश विमान बनविण्याचं स्वप्न पाहणाऱ्या कॅप्टन अमोल यादव यांचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे. पहिल्या स्वदेशी विमान निर्मितीसाठी गेली अनेक वर्ष झटणाऱ्या आणि सरकारी ऑफिसेसचे उंबरठे झिजविणाऱ्या यादव यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या प्रकल्पाला पूर्ण मदत करणार असल्याचं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्याची माहिती कॅप्टन अमोल यादव यांनी 'न्यूज18 लोकमत'शी बोलताना दिली. डिसेंबर मध्ये विमानाच्या चाचण्या असून त्या परिक्षेत ते विमान पास झालं तर यादव यांचं स्वप्न आणि देशाचं पहिलं स्वदेशी विमान टेक ऑफ घेणार आहे. मेक इंडियाला प्रोत्साहन देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या प्रकल्पांमध्ये  विशेष रस दाखवल्याने आनंद झाल्याचंही यादव यांनी सांगितलं.

धिक्कार असो...धनंजय मुंडेंच्या 'त्या' वक्तव्यावर काय म्हणाले मुख्यमंत्री

पंतप्रधान मोदींच्या भेटीविषयी सांगताना यादव म्हणाले, भेटीच्या आधीच पंतप्रधान मोदींनी माझ्या प्रकल्पाविषयी सगळी माहिती घेतली होती. त्यांना मला काहीही सांगण्याचं काम पडलं नाही. या आधी रजिस्ट्रेशनसाठीही पंतप्रधानांनी मदत केली होती. प्रकल्पाच्या सर्व बाजू त्यांनी अतिशय शांतपणे ऐकून घेतल्या आणि तुझं स्वप्न पूर्ण होईल असं आश्वासन दिलं अशी माहितीही त्यांनी सांगितली.

अनेक अडथळे आणि नियमांची शर्यत पार करत त्यांना विविध परवानग्या मिळाल्या असून आता प्रकल्प शेवटच्या टप्प्यात असल्याची माहिती यादव यांनी दिली.

महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण, काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना जवान शहीद

Loading...

काय आहे हा प्रकल्प?

भारताचं पाहिलं 6 सीटर विमान

कॅप्टन अमोल यादव यांनी आपल्या विमानाचं नाव केलं डी रजिस्टर

VT - NMD नरेन्द्र मोदी देवेंद्र या नावाने केलं होतं रजिस्टर

पालघर परिसरात घराच्या छतावर स्वदेशी तंत्रज्ञान वापरुन छोटेखानी विमान तयार करणाऱ्या कॅप्टन अमोल यादव यांना अनेक अडथळे आले होते. सरकारी लालफितीच्या कारभाराला कंटाळून यादव यांनी प्रकल्प हलविण्याचा विचारही केला होता. 2018 मध्ये मेक इन इंडिया प्रकल्पांतर्गत एमआयडीसीनं अमोल यादवांच्या कंपनीशी 35 हजार कोटींचा सामंजस्य करार केला होता. विशेष म्हणजे मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 20, 2019 08:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...