प्रवाशांना विमानातून हकलवण्यासाठी एअर एशियाच्या पायलटनं एसी केला जोरात

एअर एशिया इंडिया या खाजगी विमान कंपनीची फ्लाईट कोलकत्ता ते बागडोगरा जात होती. या विमानात पायलटनं केलेलं आमानवीय कृत्य समोर आलंय.

Sonali Deshpande | Updated On: Jun 21, 2018 12:51 PM IST

प्रवाशांना विमानातून हकलवण्यासाठी एअर एशियाच्या पायलटनं एसी केला जोरात

कोलकत्ता, 21 जून : एअर एशिया इंडिया या खाजगी विमान कंपनीची फ्लाईट कोलकत्ता ते बागडोगरा जात होती. या विमानात पायलटनं केलेलं अमानवी कृत्य समोर आलंय. हा फ्लाईट चार तास उशिरा होती. त्यामुळे प्रवासी आणि पायलट, कर्मचारी यांच्यात वादही झाले.

इंडियन आॅइल काॅर्पोरेशनचे दीपांकर रायही या विमानात होते. त्यांनी एअर एशियाच्या कर्मचाऱ्यांच्या गैरवर्तनाची तक्रार केलीय. राय यांनी पीटीआयशी बोलताना म्हटलंय, प्रवाशांना विमानात दीड तास बसवून ठेवलं आणि त्यानंतर त्यांना विमानातून उतरण्यास मजबूर केलं.

हेही वाचा

ना घोडा, ना गाडी, थेट जेसीबीतून घरी आणलं नवरीला !

InternationalYogaDay2018 : या फिट सेलिब्रिटींचा हा आहे फिटनेस फंडा !

राय यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यावेळी बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळे लोकांनी विमानाबाहेर उतरण्यास नकार दिला. त्यामुळे पायलटनं विमानातला एसी जोरात केला. त्यामुळे विमानात धुकं झालं, लोकांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला.

एअर एशियानं झालेल्या उशिराबद्दल दिलगिरी व्यक्त केलीय. कंपनीनं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलंय, तांत्रिक बिघाडामुळे चार तास उशीर झाला. पण पायलटनं जाणूनबुजून एसी जोरात केला हा आरोप फेटाळून लावलाय. त्यांनी म्हटलं एसी चालू असल्यानं विमानात समस्या निर्माण झाली. आम्ही प्रवाशांची देखभाल केल्याचा दावाही कंपनीनं केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 21, 2018 12:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close