पाकिस्तानातील या दहशतवादी तळांवर झाला हल्ला; फोटो व्हायरल

पाकिस्तानातील या दहशतवादी तळांवर झाला हल्ला; फोटो व्हायरल

एलओसीपार भारतानं केलेल्या हवाई हल्ल्याचा फोटो आता समोर आला आहे.

  • Share this:

दिल्ली,  26 फेूब्रुवारी : LOCपासून तब्बल 80 किमी आतमध्ये घुसून भारतीय हवाई दलानं दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ले केले. यामध्ये 200 पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाले आहेत. या हवाई हल्ल्याचा फोटो आता व्हायरल झाला आहे. यामध्ये भारतीय हवाई दलानं उद्धवस्त केलेल्या दहशतवाद्यांचे तळ दिसत आहेत. त्यामुळे भारतीय हवाई दलानं केलेला घुसखोरी प्रयत्न आम्ही हाणून पाडल्याचा दावा करणारा पाकिस्तान आता तोंडावर पडला आहे. पाकिस्ताननं भारतीय हवाई दलाला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. पण, भारताचं चक्रव्यूह त्यांना काही भेदता आलं नाही. भारतीय हवाई दलाच्या कारवाईनंतर पाकिस्ताननं जम्मूतील कानाचक्क येथे शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. त्याला भारतानं देखील चोख प्रत्यत्तर दिलं असून यामध्ये पाकचा एक सैनिक ठार तर, एक सैनिक जखमी झाला. यानंतर आता सीमेवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

असा झाला Air Srrike

पहाटे 3 वाजून 30 मिनिटांनी भारतीय वायु दलाच्या मिराज - 2000 या विमानांनी पाक व्याप्त काश्मीरमध्ये प्रवेश करत दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केलं. यामध्ये 200 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा केला. भारतीय वायु दलानं केलेल्या कारवाईमुळे दहशतवाद्यांना पळता भूई थोडी झाली. या हल्ल्यामध्ये 5 पाकिस्तानी सैनिक देखील ठार झाले. तर जखमींवर रूग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. 21 मिनिटं भारतीय हवाई दलानं केलेल्या बॉम्ब हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांच्या तळाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं.प्रत्युत्तरादाखल पाकनं भारतीय हवाई दलावर हल्ला केला. पण, भारतीय हवाई दलापुढे त्यांची डाळ शिजली नाही.

IndiaStrikeBack : आणखी एक दणका, गुजरात सीमेजवळ BSF ने पाडले पाकिस्तानी ड्रोन

मसूद अझरचा मेव्हणा ठार?

पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारतीय हवाई दलानं जैश ए मोहम्मदच्या तळाला लक्ष्य केलं. हवाई दलानं जैशच्या ज्या तलावर कारावाई केली तो तळ जैश ए मोहम्मदचा म्होरक्या अझर मसूदचा मेव्हणा मौलाना युसूफ अझर लीड करत होता. या हल्ल्यामध्ये 200 दहशतवादी ठार झाले असले तरी मौलाना युसूफ अझर ठार झाला की नाही? याबद्दल अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये भारतीय हवाई दलाच्या कारवाईबद्दल माहिती देण्यात आली.

'गिरे तो भी टांग उपर', भारताच्या दणक्यानंतर काय आहे पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया ?

पाकची पहिली प्रतिक्रिया

'भारतीय वायूसेनेच्या विमानांनी नियंत्रण रेषा ओलांडून 3 ते 4 मैल आतमध्ये प्रवेश केला होता. पण त्यांनी केलेल्या हल्ल्यात कोणतंही नुकसान झालेलं नसून कोणीही जखमी झालेलं नाही,' असं ट्वीट करत पाकिस्तानने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

IndiaStrikeBack : परराष्ट्र सचिवांची UNCUT पत्रकार परिषद.

First published: February 26, 2019, 12:40 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading