मराठी बातम्या /बातम्या /देश /धक्कादायक! वायू प्रदूषणामुळे भारतात दरवर्षी 10 लाख लोकांचा मृत्यू

धक्कादायक! वायू प्रदूषणामुळे भारतात दरवर्षी 10 लाख लोकांचा मृत्यू

पर्यावरण कामगिरी निर्देशांकानुसार भारताबद्दल बोलायचे झाले तर आपण 177 व्या स्थानावर आहे. आपल्या देशात हवा फक्त 5.75 टक्के स्वच्छ आहे.

पर्यावरण कामगिरी निर्देशांकानुसार भारताबद्दल बोलायचे झाले तर आपण 177 व्या स्थानावर आहे. आपल्या देशात हवा फक्त 5.75 टक्के स्वच्छ आहे.

वायू प्रदूषणामुळे देशात होणाऱ्या मृत्यूंची संख्या धक्कादायक आहे. फक्त भारतालाच नाही तर वायू प्रदूषणाचा विळखा संपूर्ण जगाला बसला आहे.

दिल्ली, 13 फेब्रुवारी : वायू प्रदूषण ही देशासमोरील सगळ्यात मोठी समस्या बनत चालली आहे. वायू प्रदूषणामुळे आरोग्याच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो आहे. देशातल्या मोठ्या शहरांमध्ये तर हे प्रमाण सर्वाधिक आहे. मात्र आता जी आकडेवारी समोर आलेली आहे ती देशासाठी नक्कीच धक्कादायक आहे. कारण वायू प्रदूषणामुळे भारतात दरवर्षी तब्बल 10 लाख लोकांचा मृत्यू होत असल्याचं समोर आलं आहे. यामुळे अर्थव्यवस्थेचं 11 लाख कोटींचं नुकसान होत आहे. जीवाश्म इंधनांच्या (Bio Fuel) वापरामुळे होणाऱ्या वायू प्रदूषणामुळे दररोज जगाला 57 हजार कोटी रुपयांचा तोटा होत आहे. ही किंमत जागतिक अर्थव्यवस्थेच्या 3 टक्के एवढी आहे. पर्यावरणीय संशोधन गटानं आपल्या अभ्यासामध्ये हा दावा केला आहे.

सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअर (सीआरईईए) आणि ग्रीनपीस दक्षिण पूर्व आशियातील अहवालात तेल, वायू आणि कोळशापासून होणार्‍या वायू प्रदूषणाच्या नुकसानाचं परीक्षण केलं आहे. अहवालानुसार प्रदूषणामुळे चीनला वर्षाकाठी 64 लाख कोटी, अमेरिका 42 लाख कोटी आणि भारताला 11 लाख कोटींचं नुकसान होतं आहे. जगभरातील जीवाश्म इंधनामुळे होणाऱ्या वायू प्रदूषणामुळे दरवर्षी सुमारे 45 लाख लोक मरतात. चीनमधील 18 लाख आणि भारतात 10 लाख लोकांच्या मृत्यूला वायू प्रदूषण जबाबदार आहे. बहुतेक मृत्यू हृदयरोग, स्ट्रोक, फुफ्फुसाचा कर्करोग आणि श्वसन संसर्गामुळे होणाऱ्या आजारांमुळे होतात. भारताची राजधानी दिल्लीत राहण्याचा अर्थ असा होतो की तिथं राहणारी व्यक्ती दररोज 10 सिगारेट धूम्रपान करीत आहे. इतकी दिल्लीतील हवा प्रदूषित आहे.

भीमा-कोरेगाव प्रकरणावरून महाविकास आघाडीत पडली पहिली मोठी ठिणगी!

वायू प्रदूषणामुळे जगभरात लाखो लोकांचा मृत्यू होत आहे. जगभरातील देश या वायू प्रदुषणावर मात करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करताना दिसत आहेत. मात्र अद्यापही वायू प्रदूषण कमी करण्यामध्ये यश आलेलं नाही. भारतातही सर्वाधिक वायू प्रदूषण हे दिल्लीमध्ये होत आहे. तिथेही ते कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. मात्र यश येताना दिसलं नाही. वायू प्रदूषणावर मात करण्यासाठी तिथं ऑड-इव्हन गाड्यांचा फॉर्म्यूला काही काळ राबवण्यात आला होता. मात्र तो ही फार काळ टिकला नाही. त्यामुळे वायू प्रदूषणावर मात करणं हे देशासमोरीलच नाही तर जगासमोरील फार मोठं आव्हान आहे.

हिंदुस्थानी आहात तर हिंदीच बोला! रणजी क्रिकेट सामन्यात कॉमेंटेटरचा आग्रह

First published:
top videos

    Tags: Air pollution, Clean india