मराठी बातम्या /बातम्या /देश /बापरे! लॉकडाउनमध्ये हवेचं प्रदूषण घटलंच नाही; उलट वाढली ओझोनची पातळी; धक्कादायक माहिती आली समोर

बापरे! लॉकडाउनमध्ये हवेचं प्रदूषण घटलंच नाही; उलट वाढली ओझोनची पातळी; धक्कादायक माहिती आली समोर

ओझोन वायूची (Ozone O3 layer) पातळी वाढल्यानं आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात, असंही निदर्शनास आलं आहे.

ओझोन वायूची (Ozone O3 layer) पातळी वाढल्यानं आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात, असंही निदर्शनास आलं आहे.

ओझोन वायूची (Ozone O3 layer) पातळी वाढल्यानं आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात, असंही निदर्शनास आलं आहे.

  नवी दिल्ली,17 नोव्हेंबर: कोविड-19 (Cobvid 19)च्या संसर्गामुळे लॉकडाउन लागू करण्यात आलं होतं. यादरम्यान धूर आणि धुरकं नसल्यामुळे स्वच्छ, निरभ्र, निळं आकाश अनेकदा दिसलं होतं. त्यामुळे हवेचं प्रदूषण (Air Pollution in Lockdown) कमी झाल्याचा दिलासा भारतीयांना वाटला होता. काही निरीक्षणांचे आकडेही तसंच दर्शवत होते; पण प्रत्यक्षात तसं नव्हतं. यादरम्यान हवेचं प्रदूषण कमी झालं नव्हतं, असं अलीकडच्या एका अभ्यासातून स्पष्ट झालं आहे. उलट या दरम्यान ओझोन वायूची (Ozone O3 layer) पातळी वाढल्यानं आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात, असंही निदर्शनास आलं आहे.

  पहिल्या लॉकडाउनमध्ये (Lockdown) म्हणजे 24 मार्च ते 24 एप्रिल 2020 दरम्यान वाहनं आणि बांधकामंही पूर्णपणे बंद होती. त्यामुळे या काळात उत्सर्जनाचं प्रमाण अत्यंत कमी झालं होतं. कॅनडामधल्या यॉर्क युनिव्हर्सिटीमधील संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार हवा तुलनेनं बऱ्यापैकी स्वच्छ झाल्यासारखी दिसत होती, सूर्यप्रकाश स्वच्छपणे मिळत होता. त्यामुळे ओझोन (O3) वायूची पातळी वाढण्यासाठी पूरक वातावरण निर्माण झालं. या काळात ओझोनची पातळी 30 टक्क्यांनी वाढल्याचं दिसून आलं.

  उत्सर्जन, वाऱ्याची दिशा आणि पाऊस या सगळ्या घटकांच्या परस्परांमधील संयोगामुळे आणि त्यांच्यातल्या केमिस्ट्रीमुळे हवेचं प्रदूषण निर्माण होतं; मात्र हवामान शास्त्राचा अजिबात विचार न करता फक्त निरीक्षणावरून माहिती नोंदवली तर त्यामुळे आकडेवारीवर परिणाम होतो असं संशोधकांचं म्हणणं आहे.

  “कोविड लॉकडाउनचा हवेच्या प्रदूषणाच्या पातळीवरचा परिणाम नेमका मोजायचा असेल तर हवामानशास्त्र आणि वातावरणीय रसायनशास्त्र यांचाही विचार उत्सर्जनाबरोबरच करणं आवश्यक आहे, ” असं यॉर्क युनिव्हर्सिटीतून पोस्टडॉक्टरल संशोधन करणाऱ्या लेह क्रिली यांचं म्हणणं आहे.

  पेट्रोल भरायला चाललात? जरा सांभाळून! भरावा लागेल 10 हजारांचा दंड

  स्थानिक उत्सर्जनामध्ये घट झाली; पण त्याचा हवेच्या प्रदूषणातील घटकांवर अत्यंत कमी परिणाम झाल्याचं क्रिली यांनी म्हटलं आहे. फक्त निरीक्षणात्मक माहिती विचारात घेतली तर नायट्रोजन ऑक्साईडमध्ये (NOx) 57 टक्क्यांनी, आणि सूक्ष्म कणांमध्ये (PM2.5) 75 टक्क्यांनी घट झाल्याचं दिसून येतं; मात्र हवामानशास्त्राचा विचार केला तर PM2.5 साठी ही टक्केवारी आठ टक्क्यांपेक्षा कमी टक्क्यांनी घटलेली दिसते. दिल्ली आणि हैद्राबाद या दोन्ही शहरांमध्ये O3ची पातळी पाच टक्क्यांच्या दरम्यान आणि 30 टक्क्यांनी वाढलेली दिसली.

  ENVRONMENTAL SCIENCE या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, उत्सर्जनाच्या स्थानिक स्रोतांपेक्षा म्हणजे वाहनं किंवा इंधनांमुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणाचा हवेच्या प्रदूषण पातळीवर अत्यंत कमी परिणाम होतो. वातावरणातल्या विविध घटना आणि वातावरणातल्या रासायनिक प्रक्रिया हवेची प्रदूषण पातळी वाढवण्यात स्वतंत्रपणे योगदान देतात.

  ग्रामीण आणि कृषी क्षेत्रावर आधारित उत्सर्जनाला प्रादेशिक उत्सर्जन समजलं जातं. यावर लॉकडाउनचा कमी परिणाम झाला. हवा पुन्हा पूर्ववत झाल्यानंतर दिल्ली आणि हैद्राबादध्ये PM2.5 च्या पातळीवरही परिणाम झाला. भविष्यातील PM2.5 बद्दलच्या रणनीतीच्या माध्यमातून राष्ट्रीय आणि स्थानिक स्रोतांवर भऱ दिला गेला पाहिजे, असं युनिव्हर्सिटीतील असोसिएट प्रोफेसर कोरा यंग यांचं म्हणणं आहे.

  उत्सर्जनाचे परिणाम, हवामानशास्त्र आणि हवेच्या प्रदूषणाचं रसायनशास्त्र यावर या अभ्यासातून भर देण्यात आला आहे. हवेच्या प्रदूषणाच्या घटकांवर कमी वेळासाठी होणाऱ्या परिणामांचा विचार करताना या तिन्ही घटकांचा विचार होणं आवशयक आहे.

  हा खेळ सावल्यांचा! भूत सारखं स्वप्नात यायचं; घाबरलेल्या पोलिसाचा टोकाचा निर्णय

  त्याशिवाय दिल्लीतल्या ओझोनमुळे निर्माण होणारे परिणाम हे व्होलाटाइल ऑरगॅनिक कम्पाउंड्सपुरते (VOC) मर्यादित आहेत. आणि ते कमी करण्याचा प्रयत्न करण्यासाठी VOC च्या सबळ घटकांवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. VOC ची आपल्या दैनंदिन आयुष्यात असलेली उदाहरणं म्हणजे बेन्झेन (प्लास्टीक, रेझिन आणि नायलॉन), फर्निचर आणि कॉस्मेटिक्समुळे निर्माण होणारा कचरा ही आहेत.

  हवेच्या प्रदूषणात समावेश असलेल्या किचकट घटकांवर नियंत्रण ठेवणं आवश्यक असल्याचं संशोधकांचं म्हणणं आहे. ओझोन आणि प्रदूषण कमी करण्याचा विचार करायचा असेल तर धोरणं तयार करताना या गोष्टींचा विचार होणं गरजेचं आहे, असं संशोधकांचं म्हणणं आहे.

  First published:

  Tags: Air pollution, India