नवी दिल्ली, 15 जुलै : एअर इंडियाने आपल्या कर्मचाऱ्यांना 6 महिन्यांपासून 60 महिने म्हणजेच 5 वर्षांपर्यंत बिनापगारी सुट्टीवर पाठविण्याची तयारी केली आहे. यासाठी एअर इंडिया बोर्डाची परवानगी मिळाली आहे.
बोर्डाचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर यांनी एअर इंडियाच्या काही कर्मचाऱ्यांना बिनापगारी पाच वर्षांपर्यंत सुट्टीवर पाठविण्याची परवानही दिली आहे. या योजनेअंतर्गत एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना 6 महिन्यांपासून ते 60 महिन्यांपर्यंतची विनापगारी सुट्टी वाढवता येऊ शकते.
Air India Board has approved a scheme whereby employees can opt to take Leave Without Pay ranging from 6 months or for 2 years and the same can be extendable up to 5 years. pic.twitter.com/Ikp3Rp2kwm
— ANI (@ANI) July 15, 2020
पहिले 2 वर्षे त्यानतर 5 वर्षांपर्यंत वाढवली जाऊ शकते सुट्टी
अधिकृत आदेशानुसार एअर इंडियाच्या सीएमडी राजीव बंसल आता कर्मचाऱ्यांना 6 ते 2 वर्षांसाठी सुट्टीवर (बिनापगारी) पाठवू शकतात. हा अवधी 5 वर्षांपर्यंत वाढवला जाऊ शकतो. सांगितले जात आहे की एअरलाइनवर आलेल्या संकटातून बाहेर पडण्यासाठी ही योजना आणण्यात आली आहे. केंद्र सरकार एअरलाइला विकण्याच्या प्रयत्न करीत असताना एअर इंडियाने हा निर्णय घेतला आहे. सध्या एअरलाइनची विक्रीची प्रक्रिया कोरोनाच्या महासाथीमुळे अडकली आहे.
चांगलं काम न करणाऱ्या (non-perfomance) कर्मचाऱ्यांना ही बिनपगारी सुट्टी दिली जाऊ शकते. यासंदर्भात व्यवस्थापन तीन स्तरावर कर्मचाऱ्यांचे मूल्यांकन करणार आहे. त्यानंतर कोणत्या कर्मचाऱ्यांना बिनपगारी सक्तीची रजा द्यायची हे ठरविण्यात येईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Air india