या भारतीय विमान कंपनीला पाकिस्तानमुळे झालं 300 कोटींचं नुकसान

या भारतीय विमान कंपनीला पाकिस्तानमुळे झालं 300 कोटींचं नुकसान

पाकिस्ताननं आपल्या हवाई हद्दीतून उडण्यास भारतीय विमानांना मनाई केली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 30 एप्रिल : भारतीय वायु दलानं पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले. दरम्यान, त्यानंतर पाकिस्ताननं भारतीय विमानांना पाकिस्तानच्या हद्दीतून उडण्यास मनाई केली. त्यामुळे आता एअर इंडियाला आत्तापर्यंत 300 कोटींचा तोटा झाला आहे. यापूर्वीच एअर इंडिया तोट्यात असताना आता पाकिस्तानच्या निर्णयामुळे हा तोटा 300 कोटीनं वाढला आहे. 27 फेब्रुवारी रोजी भारतानं बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक केला. त्यानंतर पाकिस्ताननं भारतीय विमानांना बंदी घातली. कर्मचाऱ्याचा पगार, मेटेनन्स, इंधन या साऱ्या गोष्टी पाहता एअर इंडियाला रोज 6 कोटींचा तोटा सहन करावा लागत आहे.

पाकिस्ताननं केलेल्या बंदीमुळे US ते दिल्ली या प्रवासाकरता अधिकचे 2 ते 3 तास लागत आहेत. त्याचा भार हा एअर इंडियाला सोसावा लागत आहे. याबाबतचं सर्व माहिती एअर इंडियानं संबंधित मंत्रालयापर्यंतं पोहोचवली आहे.

मसूद अझहर जागतिक दहशतवादी म्हणून घोषित होण्याची शक्यता

पुलवामा हल्ला

पुलवामा येथे 14 फेब्रुवारी रोजी झालेल्या दहशतवाद्यांच्या आत्मघातकी हल्ल्यामध्ये 40 जवान शहीद झाले. त्यानंतर भारतानं पाकिस्तानच्या हद्दीत घुसून बालाकोट येथे एअर स्ट्राईक करत 200 ते 300 दहशतवाद्यांचा खात्मा केला.

पाकिस्तान म्हणतो, आमच्या देशात दहशतवादी आहेत

पाकिस्तानमध्ये दहशतवादी आणि कट्टरतावादी असल्याची कबूली पाकिस्तानी लष्कराने दिली आहे. असे लोक देशात आहेत आणि त्यांच्या विरुद्ध खूप काही करण्यासारखं आहे असं मत पाकिस्तानाची लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल हसन गफूर यांनी व्यक्त केलंय. पाकिस्तानी लष्करानेच हे मत व्यक्त केल्यान भारताच्या दाव्याला आणखी बळकटी मिळाली आहे.

ISIS च्या म्होरक्या बगदादी जिवंत? 5 वर्षांनी समोर आला VIDEO

पाकिस्तानमध्ये दहशतवादाला खतपाणी घातलं जातं असा भारत कायम आरोप करत असतो. मात्र प्रत्येक वेळी पाकिस्तानकडून त्याचा इन्कार केला जातो. जोपर्यंत दहशतवादाला पाकिस्तान खतपाणी घालत आहे तोपर्यंत चर्चा करणार नाही अशी ठाम भूमिका भारताने घेतली आहे.

VIDEO VIRAL: पोलीस वडिलांना थांबवणाऱ्या या चिमुकल्याला पाहून तुम्हीही व्हाल भावुक

First published: April 30, 2019, 2:05 PM IST

ताज्या बातम्या