07 एप्रिल : अखेर एअर इंडियाचा महाराज नरमला असून खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावरची विमानप्रवासबंदी मागे घेण्यात आलीये.
आज (शुक्रवारी) एअर इंडियानं अधिकृत घोषणा केलीये. त्यामुळे आता रवींद्र गायकवाडांसाठी एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करण्याचा मार्ग मोकळा झालाय.
शुक्रवारी रवींद्र गायकवाड यांनी विमान वाहतूकमंत्र्यांना पत्र लिहून दिलगिरी व्यक्त केली होती. यानंतर मंत्रालयानं एअर इंडियाला बंदी मागे घेण्याविषयी सूचना दिल्या होत्या.
तसंच लोकसभेतही शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेत एनडीएच्या बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. सेनेच्या दबावानंतर भाजपने नरमाईची भूमिका घेत काल संध्याकाळीच गायकवाडांवरील विमानप्रवास बंदी मागे घेण्यास निर्णय घेतला होता.
आज अधिकृतपणे एअर इंडियानेही गायकवाडांवरील बंदी मागे घेत दार मोकळे करून दिले आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा