लँडिंग करतांना विमानाचे झाले दोन तुकडे, विमानतळावर घडला थरार!

लँडिंग करतांना विमानाचे झाले दोन तुकडे, विमानतळावर घडला थरार!

नागरी उड्डयन महासंचालनालयाने (डीजीसीए) या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

  • Share this:

कोझिकोड 7 ऑगस्ट: केरळमधल्या कोझिकोड विमातळवर एअर इंडियाच्या विमानाला मोठा अपघात झाला आहे. हे विमान रनवे वरून घसरलं असून विमानाला मोठं नुकसान झालं आहे. या विमानात 170 प्रवासी होते. दुबईहून हे विमान कोझिकोडला आलं होतं. आई एक्स 1344 हे विमान होतं. रनवे वरून हे विमान घसरलं आणि विमानाच्या पुढच्या भागाचे दोन तुकडे झाले. हा थरार कोझिकोड विमानतळवार घडला. दिवसभर मुसळधार पाऊस सुरु होता. त्यामुळे विमानतळावर प्रतिकूल वातावरण होतं. अंधारही बराच होता त्यामुळेच हा अपघात झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

एअर इंडिया एक्सप्रेसने कोझिकोड येथे धावपट्टीवर विमान घसरल्याने अपघात. समोरचा भाग फुटला, यात पायलटचा मृत्यू झाला आहे. आणि बरेच प्रवासी जखमी झाले. सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं आहे.

नागरी उड्डयन महासंचालनालयाने (डीजीसीए) या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. रनवे 10 वरून उतरल्यानंतर धावपटी संपली. आणि  खाली घसरले आणि दोन तुकडे झाले.

दिवसभरात केरळला हा दुसरा धक्का बसला आहे. मुसळधार पावसानं इडुकी जिल्ह्यात सकाळी मोठी दुर्घटना घडली आहे. दरड कोसळल्याने एका क्षणात डोळ्यादेखत अख्खी वस्ती जमीनदोस्त झाली. जवळपास 80 हून अधिक मजूर राहात असणाऱ्या ठिकाणी मोठी भूस्खलनाची दुर्घटना घडली आहे. या भूस्खलनात 80 हून अधिक मजूर दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे

Published by: Ajay Kautikwar
First published: August 7, 2020, 9:28 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading