एअर इंडियाच्या पायलटांनी उड्डाणे रोखण्याची दिली धमकी, हे दिलं कारण..

एअर इंडियाच्या पायलटांनी उड्डाणे रोखण्याची दिली धमकी, हे दिलं कारण..

सध्या वंदे मातरम अंतर्गत देशांतर्गत उड्डाणे चालविली जात आहेत. त्यादरम्यान वैमानिकांनी ही धमकी दिली आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 31 मे : एअर इंडिया पायलट्स ऑफ एअर इंडियाच्या वैमानिकांनी अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त कोणतीही उड्डाणे चालविली जाणार नसल्याची चेतावणी दिल्याची माहिती समोर आली आहे.

दिल्ली विमानतळावरील आरोग्य अधिकाऱ्यांनी वैमानिकांच्या दलासह अप्रिय व्यवहार केल्याने वैमानिकांनी हा निर्णय घेतला आहे. एअरबस विमानाच्या वैमानिकांच्या संघटना इंडियन कमर्शियल पायलट असोसिएशनने (आयसीपीए) रविवारी म्हटले आहे की, जर पायलटांसोबत असे 'वाईट' वर्तन थांबवले नाही तर त्याचे सदस्य अनिवार्य सेवा व्यतिरिक्त इतर उड्डाणे चालवणार नाहीत.

प्रोटोकॉलवर स्पष्टीकरण मागितले

एअर इंडियाचे कार्यकारी परिचालन संचालकांना लिहिलेल्या पत्रात ICPA यांनी वंदे भारत मिशन या देशांतर्गत उड्डाणे चालविणाऱ्या कोणत्या वैमानिकाला कोविड – 19 ची लागण झाल्यानंतर अवलंब कराव्या लागणाऱ्या प्रोटोकॉलबाबत स्पष्टता जाहीर करण्यास सांगितली आहे. परदेशात अडकलेल्या भारतीयांच्या स्वदेशीसाठी वंदे भारत मिशन अंतर्गत एअर इंडिया विशेष आंतरराष्ट्रीय उड्डाणे चालवित आहेत.

हे वाचा-कोरोनाला रोखण्यात यशस्वी झालेले केरळचे योद्धा महाराष्ट्राला अशी करणार मदत

लॉकडाऊन 5 मध्ये श्रीमंतांसाठी निर्णय तर गरीबांना सोडलं वाऱ्यावर, मोदींवर आरोप

रुग्णालयातील शवगृह भरले, आता मृतदेह ठेवण्यासाठी अशी केली जातेय व्यवस्था

First published: May 31, 2020, 11:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading