30 वर्षांनी लहान महिला को- पायलटचं ऐकलं नाही म्हणून झाला एअर इंडियाचा 'तो' अपघात

30 वर्षांनी लहान महिला को- पायलटचं ऐकलं नाही म्हणून झाला एअर इंडियाचा 'तो' अपघात

30 वर्षांनी ज्युनिअर असलेल्या महिला को-पायलटचं न ऐकल्यानं विमानाचं गटारात लँडिंग झाल्याचं अपघाताच्या चौकशी अंती स्पष्ट झालं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 10 मे :  एअर इंडियाच्या विमानाचं रनवेच्या बाजूच्या गटारात लँडिंग का झालं? याचं खरं कारण आता समोर आलं आहे. या अपघाताच्या चौकशीत हे कारण पुढे आलं. वैमानिकानं आपल्या सहकारी महिला वैमानिकाचं ऐकलं नाही, त्यामुळे हा अपघात झाला, असं चौकशीअंती स्पष्ट झालं आहे. विशेष म्हणजे ती को-पायलट महिला वैमानिकापेक्षा 30 वर्षांनी लहान होती.

18 महिन्यांपूर्वी म्हणजेच 2 सप्टेंबर 2017 रोजी एअर इंडियाच्या विमानाचं गटारात लँडिंग झालं होतं. यामध्ये तीन प्रवाशी किरकोळ जखमी झाले होते. शिवाय, विमानाचं देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं. जोरदार पाऊस आणि खराब वातावरणामुळे विमानाचं गटारात लँडिंग झाल्याचं त्यावेळी म्हटलं जात होतं. पण, चौकशीअंती आता आणखीन एक कारण समोर आलं आहे. महिला सहाकाऱ्याचं न ऐकल्यानं विमानाचं गटारात लँडिंग झालं होतं.  सीनिअर पायलटनं 30 वर्षं लहान असलेल्या महिला सहकारी पायलटचं म्हणणं न ऐकल्यानं विमानाचं गटारात लँडिंग झाल्याचं चौकशीअंती स्पष्ट झालं आहे. 'हिंदुस्थान टाईम्स'नं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

2 सप्टेंबर 2017 रोजी एअर इंडियाच्या एक्सप्रेस फ्लाईट IX452चं गटारात लँडिंग झालं होतं. अबुधाबी ते कोची असा प्रवास करणाऱ्या विमानामध्ये 102 प्रवासी होते. लँडिंग दरम्यान पावसाचा जोर देखील होता. दरम्यान, अशा गोष्टी टाळण्यासाठी DGCAनं पायलट आणि सहपायलटच्या वयाचा विचार करा अशी सुचना जारी केली आहे.


'या' महिन्यापासून बरसणार मुसळधार पाऊस, IMDचा दिलासा

काय आहे प्रकरण?

एअर इंडियाच्या एक्सप्रेस फ्लाईट IX452च्या अबुधाबी ते कोची या विमानाचं 2 सप्टेंबर 2017 गटारात लँडिंग झालं. यावेळी पाऊस देखील जोरदार होता. शिवाय,  ज्युनिअर महिला सहपायलटचा सल्ला मुख्य पायलटन ऐकला नव्हता. त्यामुळे विमानाचं गटारात लँडिंग झालं होतं. चौकशीतून ही बाब समोर आली आहे.

दोन्ही पायलटमध्ये 30 वर्षे वयाचं अंतर असून 13 हजार तास विमान उड्डाणाच्या अनुभवाचा फरक देखील आहे. विमान लँडिंगवेळी PIC आणि पायलटमध्ये ताळमेळ देखील नव्हता. यानंतर पायलटचं लायसन्स हे 3 महिन्यांसाठी रद्द करण्यात आलं होतं. अशा प्रकारचे अपघात पुन्हा होऊ नयेत यासाठी आता काही मार्गदर्शक तत्व देखील आखण्यात येणार आहेत.


VIDEO: धक्कादायक! सामोशात बटाट्याऐवजी आढळला कापडाचा तुकडा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: air india
First Published: May 10, 2019 04:08 PM IST

ताज्या बातम्या