VIDEO : Air India च्या मुंबईकडे निघालेल्या विमानात धक्काबुक्की; प्रवाशांनी दिली कॉकपिटचा दरवाजा तोडण्याची धमकी

VIDEO : Air India च्या मुंबईकडे निघालेल्या विमानात धक्काबुक्की; प्रवाशांनी दिली कॉकपिटचा दरवाजा तोडण्याची धमकी

एअर इंडिया (Air India) च्या दिल्लीकडून मुंबईला येणाऱ्या विमानात हा धक्कादायक प्रकार घडला. विमान उड्डाणाला विलंब झाल्याने प्रवाशांपैकी काहींनी कर्मचाऱ्यांशी धक्काबुकीही केली. पाहा धक्कादायक व्हिडिओ

  • Share this:

नवी दिल्ली, 4 जानेवारी : एअर इंडिया (Air India) च्या दिल्लीकडून मुंबईला येणाऱ्या विमानास विलंब झाल्याने प्रवाशांचा संयम सुटला. या विमानातल्या काही प्रवाशांनी कर्मचाऱ्यांशी धक्काबुकी केली, तर काहींनी एक्झिट दरवाजाही उघडायचा प्रयत्न केला. या नाट्यमय घडामोडींमध्ये प्रवाशांनी थेट कॉकपीटचा दरवाजा तोडण्याची धमकी दिली. या धक्कादायक गोष्टीचा व्हिडिओ प्रवाशांपैकीच कुणीतरी काढला आणि तो सोशल मीडियावर शेअर झाला आहे.

एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, AI 865 या विमानात गुरुवारी काही तांत्रिक बिघाड झाला आणि त्यामुळे उड्डाणास विलंब झाला. या विमानाला धावपट्टीवरून परत बोलावण्यात आले. प्रवाशांना मात्र या विलंबाचं कारण कळलं नाही. विलंबामुळे त्यांचा संयम सुटला आणि काही प्रवाशांनी कर्मचाऱ्यांना जाब विचारायला सुरुवात केली. काहींनी थेट कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. वैमानिकांनी बाहेर यावं अशी मागणी प्रवासी करू लागले. त्यामुळे या विमानात काही काळ तणाव निर्माण झाला होता.

एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमान उड्डाणाला काही तांत्रिक कारणांमुळे उशीर होत होता. दरम्यान काही प्रवाशांनी केबिन क्रू सदस्यांचं न ऐकता कॉकपिटचा दरवाजा ठोकायला सुरुवात केली. एका महिला प्रवाशाने कर्मचाऱ्याला धक्काबुक्कीसुद्धा केली.

कॉकपिटमध्ये प्रवेश निषिद्ध आहे, असं सांगणाऱ्या कर्मचाऱ्यांनी लावलेली फीत तोडण्याचा प्रयत्न काही प्रवाशांनी केला, असं एअर इंडियातर्फे सांगण्यात आलं.

एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वैमानिकांना या प्रकाराचा विस्तृत अहवाल देण्यास सांगण्यात आलं आहे. ज्या प्रवाशांनी कथित दुर्वर्तन केलं, त्याविषयीही चौकशी केली जाईल आणि त्यानंतर कारवाईचा विचार केला जाईल, असं विमान प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी (डीजीसीए)सांगितलं. तशा सूचना एअर इंडियाला करण्यात आल्या आहेत.

--------------------------------

अन्य बातम्या

iphone ची विक्री घटली, थेट सीईओ टिम कुकचा पगार कापला

भाजपबरोबर काँग्रेसनेही केली पाकविरोधी निदर्शनं; 'आप'नेही नोंदवला निषेध

CAAवर पहिल्यांदाच बोलला कॅप्टन कोहली, सामन्याआधी केले मोठे वक्तव्य

First published: January 4, 2020, 9:40 PM IST
Tags: air india

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading