Air India One: PM मोदींसाठी अमेरिकेत तयार झालं ‘खास’ विमान, क्षेपणास्त्रालाही देणार चकवा!

Air India One: PM मोदींसाठी अमेरिकेत तयार झालं ‘खास’ विमान, क्षेपणास्त्रालाही देणार चकवा!

या विमानात खास सुरक्षा यंत्रणा बसविण्यात आली असून सर्व हल्ल्यांपासून विमानाचं संरक्षण करण्याची व्यवस्था त्यात आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 14 ऑगस्ट: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या विदेश प्रवासासाठी एक अत्याधुनिक विमान तयार झालं आहे. ‘Air India One’ असं या विमानाचं नाव असल्याची माहिती सांगितली जात आहे. अमेरिकेत हे विमान तयार झालं असून लवकरच ते भारतात येणार आहे. हे विमान आणण्यासाठी Air India, Indian Air Force आणि सुरक्षा संस्थांचे अधिकारी अमेरिकेला रवाना झाल्याचं वृत्त ANIने दिलं आहे. VVIPच्या विदेश प्रवासासाठी खास या विमानाची निर्मिती करण्यात आली असून अत्याधुनिक आणि सुरक्षेच्या दृष्टीने परिपूर्ण असं हे विमान असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Boeing-777 ER या विमानाच्या सर्व चाचण्या अमेरिकेत झाल्या आहेत. आता भारतीय अधिकारी त्याची तपासणी करतील आणि ते विमान भारतात आणलं जाणार आहे. सध्या पंतप्रधान आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तिंसाठी जे विमान वापरलं जातं ते जुनं झालं आहे.

त्यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष वापरतात त्या Air Force Oneच्या धर्तीवरच भारतासाठीही बोइंगने हे विमान तयार करून दिलं आहे. या विमानाची बांधणी आणि अंतर्गत सजावट खास आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली या विमानाची अंतर्गत रचना करण्यात आली आहे.

हे वाचा - COVID-19: विख्यात गायक S.P. बालसुब्रमण्यम व्हेंटिलेटरवर, प्रकृती चिंताजनक

आकाशातून व्हिडीओ आणि ऑडिओच्या माध्यमातून पंतप्रधान कुठेही संवाद साधू शकतात अशी सोय या विमानात आहे. पंतप्रधानांसाठी कार्यालय, बैठकांसाठी खोली, इतर अधिकाऱ्यांसाठी मोकळी जाग आणि राहण्याची स्वतंत्र सोय यात आहे.

या विमानात खास सुरक्षा यंत्रणा बसविण्यात आली असून सर्व हल्ल्यांपासून विमानाचं संरक्षण करण्याची व्यवस्था त्यात आहे. क्षेपणास्त्रांच्या माऱ्याला चकवा देण्याची क्षमताही या विमानात आहे.

या विमानात एक मेडिकल कक्ष असून त्यात सर्व सोयी करण्यात आल्या आहेत. हे विमान सतत 17 तास प्रवास करू शकतं. भारतीय हवाई दलाचे पायलट्स हे विमान चालविणार आहेत.

Published by: Ajay Kautikwar
First published: August 14, 2020, 8:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading