Home /News /national /

एअर इंडिया होणार 'शाकाहारी'

एअर इंडिया होणार 'शाकाहारी'

इकॉनॉमी क्लासमध्ये नॉन व्हेज देणं बंद करण्याचा निर्णय दोन आठवड्यांपूर्वीच घेण्यात आला.

10जुलै :एअर इंडिया आता इकॉनॉमी क्लासमध्ये नॉन व्हेज जेवण देणं बंद करणार आहे. याचं कारण एअर इंडियाचा तोटा कमी करणं हे सांगितलं जातंय. गंमत म्हणजे फक्त डोमॅस्टिक फ्लाइट्समध्येच इकॉनॉमी क्लासला नॉन व्हेज मिळणार नाही. आंतरराष्ट्रीय फ्लाइट्समध्ये मात्र सर्व क्लासेसमध्ये नॉन व्हेज दिलं जाईल. इकॉनॉमी क्लासमध्ये नॉन व्हेज देणं बंद करण्याचा निर्णय दोन आठवड्यांपूर्वीच घेण्यात आला. एअर इंडियाचा तोटा कमी करण्यासाठी टाकलेले हे एक पाऊल आहे. याआधी नव्वद मिनिटांच्या फ्लाइट्समध्ये नॉन व्हेज मिळणं बंद झालंय.याआधी सलाड आणि मॅगझिनची संख्याही एअर इंडियानं कमी केली होती .त्याचं कारण केबीनचं वजन कमी करणं हे होतं. एअर इंडिया असे बरेच बदल सध्या करतेय.
First published:

Tags: Air india, India

पुढील बातम्या